स्विफ्ट चालकाने घेतला सायकल स्वाराचा जीव
गोंदिया:- गोंदिया बालाघाट महामार्गावरील भरधाव वेगाने धावणाऱ्या मोटार गाड्यांचा वेग कमी होताना दिसत नाही. अशाच एका वेगवान गाडीनेmh35 p 7310 स्विफ्ट (दि.1ऑगस्ट) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास टी पॉइंट रिंग रोड गोंदिया येथे मृतक रामकिशन नकाते वय 45 राहणार पुजारी चौक नागरा या सायकल स्वाराला मागून जबर धडक दिल्याने मयत हा जागेवरच गंभीर जखमी झाला. त्यानंतर लगेच त्याला सहयोग हॉस्पिटल गोंदिया येथे हलवण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृतकाच्या मागे एक मुलगा व पत्नी असा आप्तपरिवार आहे. याच स्विफ्ट गाडीच्या चालकाने पुढे जाऊन आय टेन एम एच 31 cs 2693 या गाडीला सुद्धा जबर धडक देऊन त्या गाडीच्या ड्रायव्हरला सुद्धा जखमी केले. या घटनेचे गुन्हा दाखल रामनगर पोलीस ठाण्यात केले आहे व पुढील तपास पोहवा तीलगामे करत आहे. या महामार्गावर प्रत्येक महिन्यात अनेक जीवघेण्या अपघातांच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. प्रशासनाकडून कागदोपत्री कारवाई करून हात वर केले जातात मात्र वेगवान वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन अपयशी झाला आहे हे नक्कीच. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणेद्वारे अनेक नियम कायदे अमलात आणले जातात मात्र अशा वेळेला एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव जातो त्याचा परिवार रस्त्यावर येतो व यंत्रणा काहीच करू शकत नाही. दिवसेंदिवस वाढत असलेल्या घटनांमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. प्रशासनातर्फे सुरक्षेची हमी दिली जात नसेल तर जनतेकडून विविध माध्यमातून वसुली केली जाऊ नये असा समज जन माणसात घर करत आहे.
भर रात्री सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्यावर ड्रंक अँड ड्राईव्ह नुसार कारवाई होताना शहरातील कोणत्याही चौकात दिसत नाही. त्यामुळे भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्यांना पोलीस यंत्रणेचे भय राहिले नाही. परिणामी अपघाताच्या घटनेत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. यातच सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेला व्यक्ती सायंकाळी आपल्या घरी सुखरूप पोहोचणार की नाही याची शाश्वती राहिली नाही. जिल्ह्यातील सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेच्या विषय ऐरणीवर आला आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक जनप्रतिनिधी हा विषय विधानसभेत मांडणार का असा प्रश्न सामान्य जनाच्या मनात घर करत आहे. या समस्येच्या निराकरणासाठी यंत्रणा काही विशेष मोहीम राबवणार की एखादा एजेंडा तयार करणार का या प्रश्नाकडे जनसामान्याचे लक्ष वेधून आहे.
राज्यातील वाहतुकीमध्ये एक्सप्रेस वे अधिकच प्रचलित आहे. त्या वे वर देखील मोठमोठे अपघात होऊन अनेक प्रवाशांचे नाहक जीव जात आहे. अशा घटनांच्या वेळी मुख्यमंत्री मृतकांना सांत्वना राशी घोषित करून त्यांचे विषय लावून धरतात, मात्र राज्यातील शेकडो महामार्गांवर दैनंदिन होणाऱ्या अपघातांच्या घटनांमधील मृतकांच्या कुटुंबासाठी अशा धनराशी का दिल्या जाऊ नये हा विषय लक्षवेधी ठरणार का? यापुढे हे पाहणे मोक्याचे ठरेल.