General

पोलीस स्टेशनला रुजू होताच सुरू केली अवैध धंद्यावर धडक कारवाईची मोहीम

गोंदिया:- अवैध धंद्यावर नियंत्रण आणणे सोपे नसले तरी त्याविरुद्ध कार्यरत असलेली कार्यपद्धती व जबर इच्छाशक्तीच्या जोरावर सहजपणे करता येऊ शकतात. याच कर्तव्यनिष्ठेचा परिचय देत नुकतेच पोलीस स्टेशन रावणवाडी येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम आहेरकर यांच्या मार्गदर्शनातील चमुने धडक कारवाई करत अवैधरित्या होणाऱ्या प्राण्यांच्या वाहतुकीला आळा घालण्याच्या कारवाईत (दि.7) रोजी रात्री एक वाजे दरम्यान चंगेरा या ठिकाणी तीन पिकप गाड्यांमध्ये कोंबून भरलेल्या 25 जनावरांसह एकूण 16 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील अंबुरे करत आहेत. या कारवाईत पोहवा संजय चव्हाण, पोहवा रंजीत बघेले, पोहवा सुबोध बीसेन, पोहवा आनंद बावनथडे यांनी मोलाची कामगिरी केली. या कारवाई द्वारे पसरलेल्या संदेशामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे. मागील अनेक दिवसापासून पोलीस स्टेशनच्या परिसरातील अनेक बीट मध्ये चालत असलेल्या अवैध धंद्यापासून जनसामान्य नागरिक परेशान होते. कार्यशैलीतून प्रतिमा निर्माण होते व प्रतिमेच्या जोरावर विश्वास संपादित केला जाऊ शकतो. पोलीस व सामान्य नागरिक यांच्यातील आपुलकी निर्माण होणे ही काळाची गरज आहे नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या कारवाईचे सत्र पाहताच परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.