जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांचा मनमर्जी कारभार आला चव्हाट्यावर!
गोंदिया:- सामान्य जनतेला शासनाकडून मिळणाऱ्या सोयी सुविधांमध्ये झालेल्या दिरंगाईमुळे अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, त्यांचे प्रतिनिधी म्हणून (दि.22ऑगस्ट)रोजी जिल्हा परिषद गोंदियाच्या दालनात माजी पंचायत समिती सदस्य अखिलेश शेठ यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय गणवीर यांचा चांगलाच समाचार घेतला त्यात विद्यार्थिनींना मिळणाऱ्या सायकल्स, चर्मकार समाजासाठी आलेल्या सोयी सुविधा, मच्छीमारांसाठी आलेले नायलॉनचे जाळे अशा विभिन्न समाज घटकातील दैनंदिन उदरनिर्वाहाच्या साधनांचा पुरवठा करण्यामध्ये अतिशय गैर जिम्मेदारीचे वर्तन करून टाळाटाळ करत असल्याची बाब त्यांनी सर्वांसमोर उघडकीस आणली. त्यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीत कट असल्या शिवाय गोरगरीब गरजू व्यक्तींच्या सेवा सुविधा पुरविण्यात त्यांना अजिबात रस नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. पीडित ग्रामीण भागातील नागरिक हा जनप्रतिनिधींच्या संपर्कात असल्याने त्यांना त्याचा थेट सामना करावा लागतो. या घटना एसीच्या ऑफिसमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांसोबत घडत नाही त्यामुळे त्याचा अनुभव कदाचित त्यांना नसावा. शेवटी शासनाकडून आलेल्या साधनांचा साठा करून ठेवण्यात अर्थ तरी काय? या घटने दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष, कृषी व पशुसंवर्धन सभापती, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
याच विभागाकडून दिनांक 17 ऑगस्ट रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन गोंदिया येथे पार पडलेल्या ‘दिव्यांगाच्या दारी’ या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. त्यात उद्घाटक म्हणून दिव्यांग कल्याण विभागाचे मार्गदर्शक, विधानसभा सदस्य बच्चुभाऊ कडू यांनी थेट मंचावरून सांगितले की, कार्यक्रमाचे नियोजन बरोबर नाही, या जिल्ह्यात दिव्यांगांच्या अनेक योजनांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. पुढील कार्यक्रमापर्यंत दिव्यांगाच्या समस्या मार्गी लावा अश्या सूचना त्यांनी दिल्या व तेथे उपस्थित शेकडो दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक भेट देऊन माणुसकीचा परिचय दिला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी हजेरी लावली नाही. अधिकारीना त्या खात्याच्या मंत्र्याची सुद्धा त्यांना पर्वा नसल्याची बाब इथे पुढे येत आहे. त्याने या समितीच्या सदस्यांना निमंत्रण पत्रिका देखील दिली नाही. काय अवस्था आहे जनप्रतिनिधींची. अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे अपेक्षित असले तरी त्या कशा थांबवता येतील यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.