खेळमहाराष्ट्

पुण्यात होणार राज्यस्तरीय सब ज्युनिअर कराटे स्पर्धेचे आयोजन

 

नागपूर :- कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्य पद स्पर्धेचे आयोजन (दि. ८ ऑक्टोबर ) रोजी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, बाणेर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे महासचिव सिहान संदीप गाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.सदर राज्य स्पर्धेतील विजेते खेळाड २४ व २५ डिसेंबर २०२३ रोजी तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे होणार्‍या अखिल भारतीय सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद,२०२३ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.तत्पूर्वी कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या सर्व जिल्हा सदस्यांनी आपल्या जिल्ह्यातील सब ज्युनिअर खेळाडुंची निवड चाचणी घेऊन विजेत्या स्पर्धकांना या राज्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्य संघटनेकडे कागदोपत्री पूर्तता करावी असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रशिक्षकांना यामाध्यमातून सुचित केले आहे.ही स्पर्धा कॉमन वेल्थ कराटे फेडरेशन (CKF), साऊथ एशियन कराटे फेडरेशन (SAKF), वर्ल्ड कराटे फेडरेशन (WKF) व इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी (IOC) यांच्याशी संलग्न असलेल्या कराटे इंडिया ऑर्गनायझेशन(KIO) मान्यतेने संपन्न होणार आहे.