विदर्भ

नवरात्रोत्सवात रास-गरबा नृत्याचे आयोजन

गोंदिया :- सध्या सगळीकडे नवरात्रीची जय्यत तयारी सुरू आहे.नवरात्रोत्सवाच्या काळात गरबा नृत्याचे मंडप विशेष आकर्षणाचे केंद्र बनले असते. त्यात लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व वर्गातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो व गरबा दांडियाची खूप क्रेझ पाहायला मिळते. अशा भव्य रास गरबा कार्यक्रमाचे आयोजन छोटी जेएम शाळा गणेश नगर गोंदिया येथे (दि.15 ते 24ऑक्टो) दरम्यान रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.या नऊ दिवसात लोक सुंदर रंगबिरंगी वस्त्र, विविध दागिने परिधान करून आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत गरबा खेळण्याचा आनंद घेतात त्यासाठी ते अनेक दिवसापूर्वीपासून गरब्याचा सराव करत असतात. गरबा हा प्रकार टीमवर्कचा एक चांगला उदाहरण आहे. त्यामध्ये उत्साह व शिस्त दोन्हीचे संगम असते. गरबा खेळताना मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यासारख्या वस्तूंपासून दूर राहत असल्यामुळे एका वेगळ्या वातावरणाचे आनंद नक्कीच जनसामान्यांना मिळतो. गरबा खेळणे हा एक चांगला व्यायाम सुद्धा आहे यामुळे शरीर ऍक्टिव्ह राहते व मानसिक समाधानही मिळते. दरम्यान या कार्यक्रमात नृत्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपले आनंद द्विगुणित करावे असे आवाहन गायत्री गरबा उत्सव मंडलचे अध्यक्ष डॉ माधुरी नासरे, रुचिता ठाकूर, नेहा सिंग, डॉ. गौरव बग्गा,दुर्गा कुसराम, कुणाल सोनी, दीपक जैस्वाल, राजेंद्र बग्गा,सुरेंद्र पारधी, डॉ. गरिमा बग्गा, राहुल बघेले, नयना बघेले, ललिता ताराम, माधुरी पंडित, वंदना बिसेन, जनार्दन कुसराम, कोमल भालाधरे, दीप्ती चौरागडे, विद्या ठाकूर, दीप्ती कटरे, नूतन गजबे, कुंतन पटले, रामेश्वरी रहांगडाले आदींनी केले आहे.