गुन्हेगारी बातमी

तरुण डॉक्टर ने गळफास लावून जीव गमावला

गोंदिया प्रतिनिधी :- अतिशय मन हेलावून टाकणारी घटना गोंदिया शहरात घडल्याने बी एच एम एस कॉलेज परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार (दि.25ऑक्टो.)रोजी सकाळी सहा वाजे दरम्यान अरुण नगर, तालुका अर्जुनी मोरगाव येथे राहणाऱ्या र्अर्जुन अपूर्व राणाची (25)प्राणज्योत मालविली. अतिशय मनमिळाऊ व मेहनती असलेल्या अर्जुन ने आपले शालेय शिक्षण गावातच पूर्ण करून वैद्यकीय अभ्यासक्रमात पदवी प्राप्त करण्याच्या उद्देशाने तो बी एच एम एस कॉलेज कुडवा येथे पदवी मिळवून मागील सहा महिन्यापासून इंटर्नशिप करत होता व सूर्याटोला येथील बांध तलाव येथे राहत होता. (दि.3सप्टें.)रोजी त्याच्या वडिलाला एक फोन आला व त्यावरून माहिती कळाली की त्यांचा मुलगा राधे कृष्ण हॉस्पिटल गोंदिया येथे भरती आहे. दरम्यान लगेच त्याचे आई-वडिल काही तासातच दवाखान्यात पोहोचले. तेव्हा कळाले की डॉक्टर अर्जुन ने गळफास घेतला होता. त्यावेळी त्याची तब्येत अतिशय गंभीर असून तो बोलण्यास सक्षम नव्हता. तेव्हापासून लागोपाठ त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले त्यानंतर त्याची तब्येत सुधारत होती. दरम्यान त्याच्या ऑपरेशन झालेल्या भागावर वाढलेल्या इन्फेक्शन च्या कारणाने तरुण डॉक्टर अर्जुनच्या आयुष्याची प्राणज्योत मालवली अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली. जवळजवळ 40-50 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना आशावादी आई-वडिलांना असे वाटले की त्यांचा मुलगा परत येईल पण तसे शक्य झाले नाही. आधुनिक युगात वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीचे अनेक उदाहरण समोर येतात मात्र यावेळी ती प्रगती कामात आली नाही असेच म्हणावे लागेल. त्याच्या अकाळी निधनाने वैद्यकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्याच्यामागे एक लहान भाऊ व आई-वडील असा आप्त परिवार आहे. दरम्यान रामनगर पोलिसांनी कलम 174 नुसार मर्ग 34/2023 दाखल करून पुढील तपास पोलीस हवालदार भागवत बसरिया आहेत.