शैक्षणिक

एन एम डी महाविद्यालयात “माणुसकीचा झरा” अनोख्या उपक्रमाचे आयोजन

गोंदिया प्रतिनिधी :- गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल मानिकलाल दलाल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व समाजशास्त्र विभाग यांच्या वतीने माणूसकीचा झरा व दीप उत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आपल्याकडील वापरणे योग्य वस्तूंचे संकलन ते गरजूपर्यत पोहोचवले जाणार आहे. २६ ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभाग,एन.एम.डी काॅलेज, गोंदिया येथे सकाळी ९ते दुपारी १२ वाजता या वेळेत संकलन सुरु आहे.
सामाजिक, शैक्षणिक , सांस्कृतिक क्षेत्रातील राष्ट्रीय बाण्यातील उपक्रमशिल व प्रगत भारतीय समाज तसेच प्रबळ भारत राष्ट्राचे सैदव चिंतन करणारे गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित एन.एम.डी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व समाजशास्त्र विभाग द्वारा ‘माणुसकीचा झरा’ या उपक्रमा अंतर्गत वापरण्या योग्य कपडे, साड्या, चादरी, ब्लॅंकेटस, लहान मुलांची खेळणी, सायकल, नविन जुने शैक्षणिक साहित्य, वह्या, वाचनीय पुस्तके, गृहउपयोगी साहित्य, तसेच विविध प्रकारच्या वस्तू संकलीत केल्या जात आहेत. त्या वस्तू समाजातील गरजूंना राष्ट्रीय सेवा योजना चे स्वयंसेवक यांचे मार्फत वितरीत केल्या जातील. तेव्हा महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी,पालक यांनी अधिकाधिक सहयोग द्यावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शारदा महाजन व कार्यक्रम अधिकारी डॉ.बबन मेश्राम, डॉ.अश्वीनी दलाल,प्रा.रवीकुमार रहांगडाले यांनी केले आहे.