महाराष्ट्

अतिसंवेदनशील जननी शिशुसुरक्षा कार्यक्रमाच्या संवेदना हरपल्या; ॲम्बुलन्स बनली प्रसुतीगृह!

गोंदिया प्रतिनिधी :- शासन महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक योजनांची निर्मिती करते मात्र ग्रामीण भागात वेगळेच चित्र पाहायला मिळते. (दि.26)रोजी गोंदिया तालुक्यातील रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असलेल्या चारगाव येथील महिलेला सायंकाळी पाच वाजे दरम्यान प्रसूतीकळा जाणवल्या. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र रावणवाडी येथे आणण्यासाठी ॲम्बुलन्स पाठवण्यात आली मात्र तेथे कोणताही वैद्यकीय स्टाफ हजर नव्हता प्रसूतीच्या कळा इतक्या गंभीर होत्या की प्रवासादरम्यान गाडीतच एका बाळाचा जन्म झाला. त्या वाहतुकी दरम्यान प्रशिक्षित व्यक्ती सोबत नसल्याने त्या बाळाचे काय हाल होऊ शकले असते याविषयी न बोललेलेच बरे. याविषयी अधिक माहिती करिता तेथील वैद्यकीय अधिकारी ड्रा पायल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,आशा वर्कर व इतर कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संप सुरू असल्यामुळे सदर ठिकाणी प्रशिक्षित व्यक्ती हजर राहू शकले नाही. तेव्हा अशावेळी कार्यरत असलेला स्टाफ व त्याची दिरंगाई या निमित्ताने पुढे येत आहे. शासन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, जननी शीशू सुरक्षा कार्यक्रम अशा अनेक योजना राबवत असले तरी गरोदर मातांप्रती प्रशासन किती गंभीर आहे, हे सहज लक्षात येते. अशावेळी यंत्रणा सक्षमतेने कार्य करु शकत नसेल तर सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ कोण करत आहे याची खात्री होते.या यंत्रणांच्या नियंत्रणासाठी रुग्ण कल्याण समिती व तालुका तसेच जिल्हा स्तरावरील अनेक आरोग्य अधिकारी आढावा घेतात मात्र त्यात काय निष्पन्न होते हे कळायला मार्ग नाही. जिल्ह्याच्या या परिस्थितीकडे आरोग्यमंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.