एन.एम.डी महाविद्यालयात राष्ट्रीय एकतेची शपथ
गोंदिया – भारताचे पहिले गृहमंत्री आणि पहिलें महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राष्ट्रीय सेवा योजना युनिट व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन प्राचार्य डॉ.शारदा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.स्वातंत्र्यानंतर देशातील अखंडता अबाधित ठेवण्यात मोलाचा वाटा उचलणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 148 जयंती आहे. त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून साजरा करण्यात आले. यानिमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शारदा महाजन यांनी राष्ट्रीय एकता शपथ रासेयो स्वंयसेवक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांना दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना महाजन यांनी २०१४ पासून ‘राष्ट्रीय एकात्मता दिना’ला सुरुवात झाली.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने २०१४ मध्ये अधिकृतपणे ‘राष्ट्रीय एकात्मता दिनाची घोषणा केली. अखंड आणि सशक्त भारताचे कट्टर समर्थक असणार्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याच्या सन्मानार्थ हा दिवस त्यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून भारत सरकारने जाहिर केला असल्याचे सांगितले.
यावेळी प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.बबन मेश्राम यांनी तर सूत्रसंचालन डॉ.अंबादास बाकरे व आभारप्रदर्शन डॉ.योगेश भोयर यांनी केले.