General

शासकीय धान्य गोडाऊन मधून नंबर प्लेट विरहित गाड्यांमधून होते मालाची वाहतूक

गोंदिया प्रतिनिधी :- जिल्ह्यातील रावणवाडी येथील शासकीय धान्य गोदामातून वाहतूक करत असलेल्या गाड्यांना नंबर प्लेट नसल्याचा प्रकार पुढे आला आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या गाड्यांचा विमा, फिटनेस सर्टिफिकेट व इतर महत्त्वपूर्ण कागदपत्र नसल्याची माहिती पुढे आली आहे. याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जिम्मेदार कोण असेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. या वाहतुकीसाठी वापरत असलेल्या गाड्या एकाच मालकाचे असल्याचे माहिती पुढे आली आहे. इतर जनसमान्यानंच्या वाहनांवर कारवाईचा बडगा दाखवून आपले रेकॉर्ड पूर्ण करणारे प्रशासन काही विशिष्ट अशा गाड्यांना विशेष सवलत देतात कसे अशा चर्चांनी परिसरात जोर धरला आहे. या गाड्यांमधून अनेकदा मालाची अफरातफर होत असल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. जनसामान्य नागरिकांच्या अन्नाच्या पूर्ततेसाठी सदर यंत्रणा कार्यकर्ते मात्र कुंपणच शेत खात असेल तर यापुढे न बोललेलेच बरे.

108 thoughts on “शासकीय धान्य गोडाऊन मधून नंबर प्लेट विरहित गाड्यांमधून होते मालाची वाहतूक

Comments are closed.