बिरसा मुंडा यांनी संघर्षासोबतच केले मोलाचे समाजकार्य – डॉ.नामदेव किरसान
सालेकसा प्रतिनिधी :- भगवान बिरसा मुंडा जयंती समारोह दरम्यान (दि. 21 नोव्हे.) रोजी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातील मौजा जोशीटोला (तिरखेडी) ता. सालेकसा जि. गोंदिया येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी जमीनदार, मालगुजार व इंग्रजांशी संघर्ष (उलगुलान) करीत असतानाच समाज सुधारणेचे सुद्धा मोलाचे कार्य केल्याचे सांगितले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सहसराम कोरोटे, पंचायत समिती सदस्या अर्चनाताई मडावी, सरपंच प्रियाताई शरणागत, माजी गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, बबलूभाऊ फुंडे, राजेश भोयर, रमण सलामे, जयश्रीताई भोयर, अंजनाताई सलामे, मनोजभाऊ शरणागत, रेखाताई टेकाम, ममताताई मोहबे, मालनबाई धुर्वे, दिलीपजी बिसेन, सदाशिव कोठेवर, राजेंद्र बिसेन, कृष्णाजी पटले, निकेश गावड व गावकरी उपस्थित होते.