संविधानामुळे मनुष्य,पशु,पक्षी सगळ्यांना समानतेचे अधिकार दिले आहे – शंभू कुमार सिंग
गोंदिया प्रतिनिधी :- संविधानाचे महत्त्व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने संविधान गौरव दिवसाच्या अनुषंगाने (दि.26 नोव्हें.)रोजी कुडवा येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना,नॅशनल दस्तक टीव्ही न्यूज चे संपादक यांनी सांगितले की,जर आम्हाला संविधानिक अधिकार नसते तर आज अंगावर कपडे सुद्धा नसते. जोपर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानाचे महत्त्व व त्याचे अधिकार कळत नाही तोपर्यंत देश मजबूत होऊ शकत नाही. आपापसात भेद करणे हे मानसिक बिमारीचे लक्षण आहे. जातिवाद हा जीवघेणा आजार असून आजच्या काळात बहुजन समाजातील व्यक्तींना मीडिया, व्यवसाय, शिक्षण, खेळ आदी क्षेत्रात दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते तर या समाजातील व्यक्ती जर कलेक्टर एस पी बनले तर त्यांच्या जातीच्या आधारावर त्यांच्याशी भेदभाव केला जातो. आधुनिक जातीवादात किरकोळ कारणासाठी येथील मंत्री सुद्धा जेलमध्ये जातात. त्यासाठी प्रत्येकाने आपला आवाज बुलंद करणे गरजेचे आहे. देशातील 90% बहुजन समाजाला शस्त्र नको तर बरोबरीच्या हक्क व सन्मानाचे जीवन पाहिजे. येथे धर्म जातीच्या नावावर अन्याय अत्याचारा चे प्राबल्य आहे. तर ह्या देशाचे शेतकरी गोरगरीब मजूर वर्ग हेच खरे राष्ट्रवादी आहेत. धर्माच्या नावावर करोडो रुपये खर्च करनारे सरकार गरीब मुलांच्या शिक्षणाची फीस भरण्याची व्यवस्था करत नाही,ही शोकांतिका आहे. या सर्व बहुजन समाजाचे हक्क अधिकार संविधानात दडले आहेत. हजारो वर्षांपासून सर्वात अधिक अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या महिलांनाच संविधानाने सर्वात जास्त अधिकार दिले आहेत. संविधानाने भारतीय नागरिकांच्या आन, बान व शान ची गॅरंटी दिली आहे. असे प्रतिपादन नॅशनल दस्तक टीव्ही रिपोर्टर शंभू कुमार सिंग यांनी केले आहे. यावेळी पाहुणे म्हणून क्षेत्रीय आमदार विनोद अग्रवाल, लोकेश यादव, जि प सभापती पूजा शेठ, उपनिबंधक शुद्धोधन कांबळे, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.