अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप
गोंदिया प्रतिनिधी :- अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने (दि.4 डिसें) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संप पुकारून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी दिलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांचे मानधन, निवृत्तीवेतन दर महिना देणे, पोषण आहाराची रक्कम वाढविणे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 25 एप्रिल 2017 च्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करून ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी, सेविकांना 26000 रुपये तर मदतनिसांना 20000 रुपये इतके वेतन देण्यात यावे, महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी वेतन वाढ करण्यात यावी, व इतर आधुनिक सोयी सुविधा पुरवाव्या यासारख्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील दोन लाखाच्या वर कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात गोंदिया जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. या दरम्यान कर्मचाऱ्यांनी रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.