बालकांचे कायदेविषयक एकदिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न
आमगाव / गोंदिया :-. इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी गोंदिया, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पोलिस विभाग व कैलाश सत्ययार्थी चिल्ड्रेन फाऊंडेशन दिल्ली यांच्या द्वारे आयोजित बालविवाह मुक्त भारत अभियान या कार्यक्रमांतर्गत बालकांचे कायदेविषयक, बालविवाह, बाल लैंगिक अत्याचार, बाल तस्करी व बालकामगार, सायबर क्राईम यावर एक दिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळा चंद्र हॉटेल आमगाव येथे घेण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन देवका खोब्रागडे अध्यक्ष बालकल्याण समिती गोंदिया तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे हे होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक वर्षा हलमारे सदस्य बालकल्याण समिती, युवराज हांडे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशनआमगाव, संजय मारवाडे पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया, प्रभाकर पालांदुरकर पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया, संजय शामकुवर संरक्षण अधिकारी महिला आमगाव, अशोक बेलेकर संचालक इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी गोंदिया, ज्ञानेश्वर पटले जिल्हा समन्वयक आई एस डब्ल्यू एस, रवींद्र टेंभुर्णीकर बाल संरक्षण अधिकारी, कपिल टेंभुर्णीकर जिल्हा बाल संरक्षण कक्ष, विशाल मेश्राम सेंटर कॉर्डिनेटर चाईल्ड लाईन यांच्या व्यतिरिक्त इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे म्हणाले की बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे व बाल हक्काचे उल्लंघन आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत 18 वर्षाखालील मुलीचे व 21 वर्षाखालील मुलाचे लग्न करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण व बाल संरक्षण संबंधित यंत्रणा व बालकामगार प्रतिबंधक अधिनियम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. देवका खोब्रागडे अध्यक्ष बालकल्याण समिती यांनी बालकल्याण समितीच्या कार्यप्रणाली बद्दल माहिती सांगितले. पुढे युवराज हांडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आमगाव यांनी बालकांचे काळजी व संरक्षण याविषयी पोलीस विभागांची भूमिका व पालकांचे कर्तव्य व जबाबदारी यावर मार्गदर्शन केले यानंतर संजय मारवाडे व प्रभाकर पालांदुरकर पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया यांनी सायबर क्राईम यापासून आपला बचाव कसा करता येते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कौटुंबिक हिंसारापासून महिलांचे संरक्षण या विषयावर संजय श्याम कुमार संरक्षण अधिकारी महिला यांनी मार्गदर्शन केले. यानंतर पुढे बालविवाह विरोधात शपथ अशोक बेलेकर संचालक इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी गोंदिया यांनी उपस्थित सर्वांना दिली.
यावेळी बालविवाह मुक्त भारत अभियानाच्या खबरदार या पोस्टरचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडले.कार्यक्रमाचे संचालन व आभार ज्ञानेश्वर पटले जिल्हा समन्वयक आय एस डब्ल्यू एस यांनी केले.
या कार्यक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी, चाइल्ड लाईन कर्मचारी, बालविवाह मुक्त भारत अभियान कार्यक्रमाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते