एन. एस. एस शिबिरातून व्यक्तिमत्वाचा विकास घडवावा -तहसिलदार विशाल सोनवाने
गोंदिया :- राष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्वाचे आहे. स्वयंसेवकांनी ग्रामीण भागातील माणसाचे जीवन समजून घेतले पाहिजे. खेडोपाड्यात राहणाऱ्या गोरगरीब माणसासाठी आपण काम केले पाहिजे. या शिबिरांमधून आपल्यामध्ये नक्कीच अशी भावना निर्माण होईल व पुढे आयुष्यामध्ये आपण राष्ट्रासाठी काही एक काम कराल. असे विचार एन. एम. डी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना च्या निवासी शिबीराचे उद्घाटन निमित्ताने अप्पर तहसिलदार विशाल सोनवाने यांनी व्यक्त केले.
गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल माणीकलाल दलाल महाविद्यालय, गोंदिया च्या राष्ट्रीय सेवा योजना युनिट द्वारा तालुक्यातील सेजगाव केंद्र भानपुर येथे दि.21फरवरी ते 28 फरवरी पर्यंत निवासी शिबिराचे आयोजन संस्था सचिव राजेंन्द्रजी जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.
उद्घाटन सोहळ्यांचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य शारदा महाजन होते तर प्रमुख उपस्थित अप्पर तहसीलदार विशाल सोनवाने, जि. प सदस्य अंजली अटरे, संरपच प्रमोद पटले, अ. भा. बापु युवा संघटनाचे अध्यक्ष अँड. योगेश अग्रवाल, केंन्द्र प्रमुख श्रीमती एस. बी खोब्रागडे, निवडणूक मंडळ अधिकारी डोमेश हत्तीमारे, तंटामुक्ती अध्यक्ष राजाराम चवरे, मुख्याध्यापक फाल्गुन कावळे, डा.रविन्द्र मोहतुरे, डा. अर्चना जैन, डा. सुयोग इंगले, डा. योगराजसिंग बैस, डा. कपिल चौहान, गोपाल बारेवार, सुरेश बिसेन, सुनिल पवार, पोलीस पाटिल विजय टेंभरे, भरत टेकाम, ग्रामसेवक कमलापती उपव़शी,शिबीर प्रमुख डाँ. अश्वीनी दलाल, प्रा. रवीकुमार रहांगडाले, डाँ. प्रियदर्शना नंदेश्वर, प्रा. तारेंन्द्र पटले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम अधिकारी डा. बबन मेश्राम यांनी प्रास्ताविक भाषणातून राष्ट्रीय सेवा योजना मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामांचा घोषवारा सांगितला. जे स्वयंसेवक राष्ट्रीय सेवा योजनामध्ये सहभागी झालेले आहेत ते खूप नशीबवान आहेत असे त्यांनी सांगितले कारण आपण आपल्या घरातून सात दिवस बाहेर राहून श्रम करतो, त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते असे सांगितले.तर उद्घाटन सोहळाचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड केली पाहिजे. वृक्षाचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. तसेच जातीपातीच्या पलीकडे जाऊन गाव विकासाठी झटले पाहिजे. समाजातील सर्व प्रकारच्या जातीभेद मिटून आपण एक आहोत ही भावना जनमानसात रुजली पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करताना त्यांचा बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक विकास करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर घेण्यात येतो. गावागावात स्वच्छ्ता,आरोग्य, पर्यावरण संवर्धन यांसाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कार्य करणे, हेच या शिबिराचे खरे फलित आहे. मी गावाला आदर्श करू शकतो, या भावनेतून मानवतावादी विचारांना चालना देणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन एन. एम. डी महाविद्यालयाचे प्राचार्य डा. शारदा महाजन यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचलन रासेयो वरीष्ठ प्रतिनीधी निखिल बन्सोड यांनी तर आभार प्रदर्शन रासेयो शिबीर विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. हर्षू बावनकर हिने केले.शिबिराच्या यशस्वीते करीता शुशिल गौतम,अमित बडोले, मनिष दहिकर, सार्थक बोरकर, ओम परमार, डिम्पल ढोरे, झामसिंग बघेले, चाहत मेश्राम, शिवानी हाडगे, थामेश हरीणखेडे, अंजली गणवीर, सेजल तिवारी, निलीमा येल्ले, शिल्पा गौतम,रविन्द्र कावळे, सलोनी बल्ले, गायत्री बनकर, श्रध्दा नागरीकर, सेजल राऊत, दिपीका बिसेन, राणी बिसेन, सोनम सुलाखे, इशा सतदेवे, पुजा लिल्हारे, दिक्षा नान्हे, मोनिका नागपुरे, सुनिता हरीणखेडे, राणी शिवनकर, दिव्या मरसकोल्हे, हितेन्द्र पारधी, पवन चव्हान, महेन्द्र बावने यांनी अथक परीश्रम घेतले.