राजकीय

शेतकऱ्यांच्या पिक कर्जावरील ६% व्याज रद्द करा:- मिथुन मेश्राम कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गोंदिया

सड़क अर्जुनी :- शेतकऱ्यांना वेळेवर त्यांचा धानाचे चूकारे व‌ बोनसची रक्कम मिळाली नाही. शेतकऱ्याला कर्ज भरणे कठीण आहे. अशा परीस्थिती मध्ये शेतकऱ्यांकडून व्याज घेणे योग्य नाही. याविषयीचे निवेदन (दि. 14) रोजी नायब तहसीलदार शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. शेतकरी आधीच कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांकडून आकारण्यात आलेले.‌६% व्याज हा रद्द करावा. जेणेकरून शेतकरी यांना पिक कर्जाची रक्कम परतफेड करणे शक्य होईल. सरकार ने घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे. शेतकऱ्यांचे शोषण करण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करत आहे. सरकार ने अजून पर्यंत महामंडळ ला पैसे पाठविले नाही. वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सात तारखेच्या सभेमध्ये सांगितले की बोनसची रक्कम सायंकाळी पर्यंत जमा होईल अजून पर्यंत कोणाच्याच अकाउंटला बोनस ची रक्कम जमा झालेले नाही. व शासनाने अजून पर्यंत महामंडळ ला पैसे पाठवले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे चुकारे येण्यास आहेत ही सरकार फक्त बॅनरबाजी जाहिरात बाजी आणि उद्योगपत्यांचे कर्ज माफ करायचे काम करतो. शेतकऱ्यांकडुन 6% व्याज पीक कर्जावर घेत आहेत आणि सांगतात की केंद्र सरकार व राज्य सरकार तीन टक्के प्रमाणे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी मार्फत पाठविले जातील शेतकऱ्यांच्या हक्काचे धानाचे पैसे यांना द्यायला वेळ लागतो तर हे व्याजाचे पैसे देतील हे कशावरून आणि द्यायचेच आहेत तर त्यांनी डायरेक्ट बँकांना द्यावे.भंडारा गोंदिया जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना फक्त ठेकेदारीच्या कामासोबत महत्त्व आहे त्यांना शेतकरी बेरोजगार यांच्याशी काही घेणेदेणे नाही इथले लोकप्रतिनिधी इथल्या जनतेचे प्रश्ना कधी विधान भवनात व संसदेत मांडत नाही त्यांना फक्त रोड रस्त्यांच्या कामांमध्ये महत्त्व देतात‌ परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही शेतकऱ्यांवरील अन्याय खपवुन घेणार नाही. ८ दिवसात हा निर्णय रद्द करावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा मिथुन मेश्राम कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी दिला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष मंजु डोंगरवार, युवक जिल्हाध्यक्ष आशिष येरणे, तालुका महिला अध्यक्ष रूपा गिरेपुंजे, तालुका युवक अध्यक्ष खुशाल डोंगरवार, देवानंद तागडे, रमेश डोंगरवार, अरविंद मेंढे, गजानन सुकारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.