तंत्रज्ञान

राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण महिन्यानिमित्त राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे आयोजन

गोंदिया :- केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया येथे (दि. – 16 व 17) रोजी राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण महिना मार्च 2024 अनुसरून के टी एस सामान्य रुग्णालय गोंदिया अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ व DIEC यांच्या सहकार्याने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथकाद्वारे तपासणी दरम्यान निघालेले संशयीत हृदय रुग्ण मुलांची तपासणी( 2D Echo )उप जिल्हा रुग्णालय तिरोडा जिल्हा गोंदिया येथे करण्यात आली तपासणी आचार्य विनोबा भावे रुग्णालय वर्धा येथील डॉ शंतनू गोमासे सर यानी केली सोबत समन्वयक प्रतीक गडकरी उपस्थित होते शिबिराचे उद्घाटन मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अमरीश मोहबे सर यांनी केले. शिबिरामध्ये अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तृप्ती कटरे भगत मॅडम , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती जैसवाल सर , वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय भगत सर तसेच संपूर्ण अधिकारी कर्मचारी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम गोंदिया जिल्हा व सर्व DEIC कर्मचारी उपस्थित होते.