शैक्षणिक

निवासी शाळा नंगपूरा-मुर्रीच्या विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी तयार केली पाणसोयी….

पक्षी वाचवा- देश वाचवा संकल्पना : टाकाऊ पासून टिकाऊची निर्मिती उपक्रम

गोदिंया : लागून असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपूरा मुर्री येथील विद्यार्थ्यांनी जागतिक जल दिवस व महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह या दोन्हीही मानव मुक्तीच्या लढ्याला साक्षी ठेवून रविवार हा सुट्टीचा दिवस असून हा व्यर्थ जाणार नाही, या दिवशी काहीतरी उपयोग व्हावा, सार्थकी लागावे म्हणून विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी पानसोयीची निर्मिती करुन पक्षी वाचवा देश वाचवा ही संकल्पना राबविली आणि यशस्वी करण्यात आली.

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा-मुर्री येथील वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी सर्व प्लास्टिकच्या बॉटल, बरणी, बिसलेरीच्या बॉटल्स अशा जमा करून एकत्र केल्या. केन, कंपास आणि आरीचा वापर करून या सर्व साहीत्याचा उपयोग करून पक्षांना पिता येईल अशी सोय करण्यात आली.

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी या पानसोयीचे साधन म्हणजेच प्रत्येक बादल्या ह्या प्रत्येक झाडाला टांगून त्या ठिकाणी पाणी घालून प्रत्येक झाडाला शालेय परिसरात लावलेले आहे. या पानसोयीची व्यवस्था करणारे व या उपक्रमात एकूण 31 विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ आणि ती उपयोगी व्हावे म्हणून या पाणसोयीची व्यवस्था तयार करण्यात आली. यामध्ये अनामिक दुर्योधन, सावन जाधव, योगेश डोंगरे, प्रणय भैसारे हेमंत उईके सुमेध शेंडे तुषार बागडे अमोल शहारे क्रिस रामटेके मयूर भिमटे संस्कार दांडेकर आयुष भैसारे सुबोध रामटेके, रोहन पटले सोहन पटले विश्वजीत गजभिये प्रशांत रक्षा विकी कोकोडे मुनीसर ताराम वेदांत चव्हाण वेदांत शहरे यश डाहाट आर्यशील घोडीचोर आयुष रामटेके खुशाल जगनित होमेंद्र मानकर हर्षल सांगोडकर संकल्प गणविर मंथन कांबळे व शुभम राऊत या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले व हा उपक्रम यशस्वी करण्यात आला.

जागतिक जलदिन याचे औचित्यत साधून व महाडचे चवदार तळे हा मुक्तिसंग्राम या दोन्ही कार्याचे औचित्य साधून आम्ही आमच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा-मुर्री येथे पक्षी वाचवा देश वाचवा ही संकल्पना स्वतः तयार करून यासाठी विद्यार्थ्यांसह पक्षांसाठी पानपोसी तयार केली व ती झाडाला टांगून ठेवलेली आहे. उन्हाचे दिवस असल्यामुळे पक्षांना डोंगर दरीखोऱ्यामध्ये पाणी मिळत नाही, त्यामुळे आम्ही या ठिकाणी पक्षांसाठी पानसोयीची व्यवस्था केलेली आहे. हा उपक्रम चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी सहकार्याची भावना ठेवून तो यशस्वी केला. याचा आनंद आहे.
– मुन्नाभाई नंदागवळी (उपक्रमशील शिक्षक)
अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपूरा मुर्री.

आमची शाळा ही उपक्रमशील शाळा म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. आमच्या शाळेत वेगवेगळे उपक्रम विद्यार्थी व शिक्षक राबवित असतात आणि अशा उपक्रमातूनच आमची शाळा पुढे प्रगती करत आहे आणि अशीच प्रगती करत राहील याची मी हमी देतो.
– रविशंकर इठूले, मुख्याध्यापक
अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपूरा-मुर्री.

पक्षी वाचवा- देश वाचवा ही संकल्पना प्रत्येकाने रुढ करावी.
अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपूरा मुर्री येथील माध्यमिक शिक्षक मुन्नाभाई नंदागवळी यांची पक्षी वाचवा देश वाचवा ही संकल्पना निर्माण केली. अशा नाविन्यपूर्ण संकल्पना तज्ञांनी करून यशस्वीरीत्या राबविणे काळाची गरज आहे.