गुन्हेगारी बातमी

नाकेबंदी दरम्यान भरारी पथकाने जप्त केले एक कोटी 76 लाख

गोरेगाव :- जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांच्या मार्गदर्शनात निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या चमुने ( दि 27) रोजी सोनी नाका जवळ FST व SST टीमचे पथक प्रमुख बाबा शिंदे,सरिता लिलहारे, विलास सूर्यवंशी, रंजना चानप , रामानंदा दास, श्यामकला भोयर , संदीप पटले यांनी संयुक्त कार्यवाही करत 1कोटी 76 लाख रक्कम जप्त केली. तसेच दुसऱ्या कारवाई मुंडीपार नाक्यावर जवळ झालेल्या नाकाबंदी दरम्यान पुन्हा 5 लाख रुपये रोख जप्त केले. यावेळी तहसीलदार किसन भदाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा ,रक्कम सील करणे तसेच पंचनामा ESMS अँप वर भरून तसेच इतर कार्यवाही केली. PI अजय भुसारी व psi घोलप साहेब यांनी कायदेशीर कार्यवाही केली तसेच तहसीलदार गोमासे मॅडम तसेच निवडणूक निर्णय अधीकारी पूजा गाइयकवाड मॅडम यांनी मार्गदर्शन केले.