पाण्याशिवाय उज्वल भविष्याची कल्पनाच करता येत नाही.. . डॉ. विक्रम अं. आव्हाड
सडक अर्जुनी:- पाणी हेच जीवन आहे हे आपण नेहमीच ऐकत आलो, जल है तो कल है या उक्तीप्रमाणे पाण्याशिवाय उज्वल भविष्याची कल्पनाच करता येत नाही. जीवनातील सर्व कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते पाणी हे पृथ्वीवर उपलब्ध असलेले अमूल्य स्त्रोत आहे, ते सर्व सजीवांच्या जगण्याचा आधार आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ५१ क प्रमाणे नदी, नाले, सरोवरे यांचे संवर्धन व जतन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे मुलभूत कर्तव्य आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे झपाट्याने वाढणारे प्रदूषण आणि लोकसंख्येत सातत्याने होणारी वाढ यामुळे प्रत्येक व्यक्तीला पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे हे मोठे आव्हान आहे. आजही देशातील अनेक भागात पाण्याची समस्या गंभीर होत आहे दरवर्षी ही समस्या पूर्वीपेक्षा अधिकच वाढते. येत्या काही वर्षांत जलसंकटाची समस्या अधिक तीव्र होईल.
22 मार्च रोजी साजरा केला जाणारा जागतिक जल दिन ही केवळ औपचारिकता न राहता पाण्याचा योग्य वापर व पाणी वाचवण्याची प्रतिज्ञा घेऊन इतरांना या संदर्भात जागरूक करण्याचा दिवस आहे. जनतेला जलसंधारणाबाबत जागरुकता नाही. कष्टाने पाणी मिळते तिथे लोकांना पाण्याचे महत्त्व कळत असते पण ज्यांना आज सहज पाणी मिळत आहे ते मात्र बेफिकीर आहेत. आजही अनावश्यक कामासाठी पाण्याचा अपव्यय केला जात आहे. पाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी विविध कार्यक्रमांतून जनजागृती होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश व तालुका विधी सेवा समिती सडक अर्जुनी चे अध्यक्ष मा. डॉ विक्रम अं. आव्हाड यानी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. मा. ना. उच्च न्यायालय, बॉम्बे तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये दि. २२/०३/२०२४ रोजी दिवाणी न्यायालय, सडक अर्जुनी येथे जागतिक जल दिनानिमित्ये जनगागृतीस्पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यातण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. ॲड. आर. के. लंजे यांची पब्लिक नोटरी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मा. अध्यक्षांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
सदर कार्यक्रमास ॲड डी. एस. बन्सोड (अध्यक्ष, तालुका वकील संघ, सडक-अर्जुनी), ॲड. एस. बी. गिन्हेपुंजे (वरिष्ठ अधिवक्ता), ॲड. ओ. एस. गहाणे (सहा. सरकारी अभि. सडक-अर्जुनी) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच ॲड. रिता राऊत, ॲड. एम. ए. बंसोड, ॲड. व्ही. डी. रहांगडाले, ॲड. सी. पी. शंभरकर, ॲड. के. एस. रामटेके व संपूर्ण अधीवक्ता वर्ग, न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक श्री एन.जे. लांजेवार व सर्व न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री. एस. एच. बिसेन (कनिष्ठ लिपीक) व आभार प्रदर्शन श्री. एन. बी. परीहार (कनिष्ठ लिपीक) यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजनासाठी संपूर्ण वकील संघ व न्यायालयीन कर्मचाऱ्याऱ्यांनी सहकार्य केले.