शैक्षणिक

नीलकमल स्मृती फॉउंडेशन तर्फे दिव्यांग विद्यार्थी छयांशचा सत्कार

सडक अर्जुनी :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोहमारा येथील इयत्ता पाचवीतील दिव्यांग विद्यार्थी छयांश विजय बडोले हा नुकताच नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाला असून त्याची नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठी निवड झाली. त्याबद्दल नीलकमल स्मृती फाउंडेशन सडक अर्जुनी तर्फे आयोजक आर. व्ही.मेश्राम व आयोजिका प्रज्ञा मेश्राम यांच्याकडून मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ 1 एप्रिल 2024 ला जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा सडक अर्जुनी येथे ‘दिव्यांग विद्यार्थी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम’ प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, नोटबुक व पेन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जी. जे. कापगते केंद्र प्रमुख सडक अर्जुनी,सौ. एम. बी.गहाणे मुख्याध्यापिका जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा सडक अर्जुनी, मुलाचे वडील विजय बडोले, आई रेखा बडोले,पत्रकार बिरला गणवीर, प्रभाकर भेंडारकर,विशेष शिक्षक विनोद फुंडे, रंज्जू डोंगरे, दीनदयाल बोपचे, शिक्षिका कु. एस. एम. चाचेरे, कु. के.आर. भोयर, कु. व्ही. डी. वासनिक, आयोजक आर. व्ही. मेश्राम व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सडक अर्जुनी.छयांश बडोले चा सत्कार करतांना केंद्रप्रमुख कापगते, मुख्याध्यापिका गहाणे, आयोजक मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते.