शैक्षणिक

फन फ्रोलिक उन्हाळी शिबिराचे थाटात उद्घाटन

अर्जुनी/मोर :- स्थानिक श्रीमती केशरबाई शिक्षण सांस्थाद्वारा संचालित सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट येथे फन फ्रोलीक उन्हाळी शिबिराचे थाटात उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष डॉ. बल्लभदास भुतडा, संस्थाध्यक्ष जयप्रकाश भैय्या, सचिव सर्वेश भुतडा, समन्वयक भगीरथ गांधी, प्राचार्या शैव्या जैन, उपप्राचार्या छाया घाटे, मुख्याध्यापिका कल्पना भुते, पर्यवेक्षक महेश पालीवाल, प्रा. टोपेशकुमार बिसेण वंदना शेंडे उपस्थित होते. प्रथमतः फीत कापून, माता सरस्वती यांच्या छाया चित्राचे पूजन व दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. पंधरा दिवसीय उन्हाळी शिबिर दोन गटांमध्ये घेण्यात येत आहे. ज्यामध्ये पहिला गट 3 ते 8 वर्ष व दुसरा गट 9 ते 16 वर्ष आहे. हे शिबिर संध्याकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये घेण्यात येत आहे. त्यामधे चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, संगीत, आर्ट अँड क्रॉफ्ट, संस्कार गीत, योगा अँड एरोबिक्स, मेहंदी, होम डेकोरेशन, हॅण्डलूम या विषयांचा समावेश केलेला आहे. मुलांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने संस्थेने या उन्हाळी शिबिराचे आयोजन केलेले आहे. 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्याकरिता पायल हजारे, संगीता बागडे, दिप्रसेन मंडल, रीना सय्यद यांचे सहकार्य लाभत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कांचन भेंडारकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपाली दहिवले, उषा नेवारे,ज्योती चुटे, हेमलता खुणे, अश्विनी शाहारे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.