सडक अर्जुनी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती थाटात साजरी
सडक अर्जुनी :- संबोधी बौद्ध समाज कल्याण बहुउद्देशीय संस्था सडक अर्जुनीच्या वतीने 14 एप्रिल 2024 ला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती सोहळ्याचे थाटात आयोजन करण्यात आले . संबोधी बौद्ध समाज विहारात सकाळी बुद्ध पूजा व वंदना घेण्यात आली. जयप्रकाश फुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्य रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण दिनेश पंचभाई यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. आंबेडकर वार्डातील ध्वजारोहण शिक्षक विनय फुले यांच्या हस्ते, पटेल वार्डातील ध्वजारोहण सेवानिवृत्त पोस्टमन श्री बडोले,व आनंदनगर येथील ध्वजारोहण प्रा. डॉ. राजकुमार भगत यांच्या हस्ते करण्यात आले .दुपारी दोन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डातून
आकर्षक झाकीसह जय भिमच्या जयघोषात ,आतषबाजी, बँड पथकासह शहरात धम्म रॅली काढण्यात आली.उल्लेखनीय म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी विहारात, विविध वार्डात व धम्म रॅलीत बौद्ध उपासक व उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झालेत.शहरातील प्रत्येक वार्डात धम्मरॅली नेवून संबोधी बौद्ध विहारात धम्म रॅलीचा समारोप करण्यात आला.यावेळी धम्मभोजन देण्यात आले.रात्री सात वाजता चंद्रपूर येथील प्रबोधनकार अश्विनी रोशन यांचा संगीतमय जाहीर प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुनी/ मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे होते.कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले व सहउद्घाटक म्हणून गोंदिया जिल्हा युवा संकल्प परिवर्तन संघटनेचे प्रणेते डॉ.अजय संभाजी लांजेवार होते . याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगरपंचायतचे नगरसेवक शशिकला टेंभूर्णे, दीक्षा भगत, अंकित भेंडारकर, अश्लेष अंबादे, गोपीचंद खेडकर,अनिल राजगिरे, जागेश्वर वैद्य, प्रा.डॉ. राजकुमार भगत, आर. व्ही. मेश्राम, ओमप्रकाश टेंभुर्णे,प्रमोद फुले, आदिल शेख, जयप्रकाश फुले,विलास कोटांगले,संबोधी बौद्ध समाज कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विदेश टेंभुर्णे, उपाध्यक्ष रंजिता मेश्राम, सचिव भाग्यवान शहारे, सहसचिव जयंत शहारे, कोषाध्यक्ष रुपचंद खोब्रागडे, कार्यकारिणी सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन बिरला गणवीर यांनी केले तर आभार रजनीश पंचभाई यांनी मानले. कार्यक्रमाला बौद्ध उपासक व उपासिका तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संबोधी बौद्ध समाज कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व समाज बांधवांनी सहकार्य केले.