विदर्भ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानेच समाजाची प्रगती साधता येईल: मुन्नाभाई नंदागवळी यांचे प्रतिपादन

पंचशील बौध्द समाज नंगपूरा-मुर्री येथे आंबेडकर जयंती साजरी

गोदिंया : या जगाला परंपरेच्या बंधनातून मुक्त करुन, स्वतः उच्च विद्याविभूषित होऊन, समाजाला गतिमान केले. समाजाचे उध्दार करण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे. या विचारसरणीने समाज पूढे गेला पाहिजे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची समाजाला फार आवश्यकता आहे. हे विचारच माणसाचे जीवन बदलू शकते, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानेच समाजाची प्रगती साधता येईल. असे प्रतिपादन युवा समाज प्रबोधनकार व मार्गदर्शक मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले. ते पंचशील बौध्द समाज नंगपूरा-मुर्री येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

यावेळी विचार मंचावर समाजाचे जेष्ठ शुभम जांभूळकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य मार्गदर्शक म्हणून मुन्नाभाई नंदागवळी, प्रदीप ढवळे, गोपाल नंदेश्वर, पंचायत समिती सदस्य सयजा सोनवणे, कविता लिचडे सरपंच, शेखर शहारे उपसरपंच हितेंद्र नंदेश्वर, विजय भैसारे, इंद्रकला पारधी, मंदा भिवगडे, सुधा टेंभेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुंबई येथे राहणारे उत्तमदास टेंभेकर यांनी समाजाला मंच स्टेज दान केले त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तथागत बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मंचावर पाहूण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला. त्रिशरण पंचशील सामुहिक ग्रहण करण्यात आली.

मार्गदर्शन करताना नंदागवळी पुढे म्हणाले- बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या अथक कार्याने, आचराने व विचाराने आपला बौद्ध समाज हा समाधानाचे दिवस जगतोय. म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानेच बौध्द समाजाची प्रगती होईल असे ऊर्जावान संदेश दिले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संचालन महेंद्र टेंभेकर यांनी केले तर आभार पंकज भैसारे व कमल साखरे यांनी मानले. जयंती थाटामाटात साजरी करण्यासाठी पंचशील बौध्द समाज येथील मेहूल टेंभेकर, संदीप टेंभेकर मोंटी इंदूरकर कमल साखरे देवा शहारे ममता टेंभेकर रेखा इंदुरकर भरती टेंभेकर मंगला भैसारे सुनंदा जांभूळकर सुनिता टेंभेकर यांनी परिश्रम घेतले.