मुलींचे शासकीय वसतिगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
सडक अर्जुनी. :- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या स्थानिक मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात रविवारी (ता.14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्तीगृहाच्या गृहपाल नादीरा नंदेश्वर होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व माल्याअर्पण करून करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वस्तीगृहात 12 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्यात.या स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेतला होता. 14 एप्रिलला विद्यार्थिनींनी गीत, भाषण, बाबासाहेबांचे जीवन चरित्र सांगितले.या कार्यक्रमांमध्ये वस्तीगृहाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या तसेच क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी मीना शिवनकर सरिता पंचभाई हे उपस्थित होते.गृहपाल नंदेश्वर यांनी विद्यार्थी जीवनात कसे वावरले पाहिजे.ध्येय निश्चित करून पुढील वाटचाल केली पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी मेश्राम यांनी केले व आभार माधुरी गोंधर्य यांनी मानले.
कार्यक्रमाला वसतिगृहाच्या विद्यार्थीनी व क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी मीना शिवणकर, सरिता पंचभाई उपस्थित होते.