वसुंधरेचे रक्षण हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे…… डॉ. विकम अं. आव्हाड
सडक अर्जुनी :- पृथ्वी एकमेव असा ग्रह आहे ज्या वर जीवन संभव आहे. पृथ्वीवर मानव, प्राणी, पक्षी तसेच झाडा वेलींकरीता पाणी व प्राणवायु मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पृथ्वीवर सजीवांसाठी योग्य वातावरण असल्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. मानव केवळ मनुष्य जातीच्या स्वार्थाकरीता, भौगोलीक सुखाच्या हव्यासापायी नैसर्सिक साधन संपत्तीचा नाश करत आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्या उग्र रूप धारण करत आहेत. वातावरणातील प्रदुषनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे म्हणून निसर्ग व मानवामध्ये संतुलन राखण्यासाठी व पृथ्वीवर मनुष्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी वसुंधरेचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश व तालुका विधी सेवा समिती सडक अर्जुनी चे अध्यक्ष मा. डॉ. विक्रम अं. आव्हाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
मा. ना. उच्च न्यायालय, बॉम्बे तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोदिया यांचे मार्गदर्शनाखाली दि. २२/०४/२०२४ रोजी दिवाणी न्यायालय, सडक अर्जुनी येथे ‘जागतिक वसुंधरा दिनानिमित्ये’ जनगागृतीस्पर कार्यकमाचे आयोजन करण्यातण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यकमास अॕड. डी. एस. बन्सोड (अध्यक्ष, तालुका वकील संघ, सडक-अर्जुनी), अॕड. एस. बी. गिन्हेपुंजे (वरिष्ठ अधिवक्ता), अॕड. आर. के. लंजे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आजच्या प्रगतीशिल जगात विकासाच्या नावाखाली वृक्षतोड, शेतीत रासायनिक खताचा अतिवापर, भूगर्भातील पाण्याचा अतिउपसा, औद्योगीककरणामुळे निर्माण होणारे विषारी वायु, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी पारंपारीक उर्जा संसाधनांवर पडणारा भार यांचा पर्यावरणावर परीणाम होवून त्याचा विपरीत परीणाम पृथ्वीवर ही होतो. म्हणून पृथ्वीच्या रक्षणासाठी विविध उपाययोजनांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास अॕड. एम. एस. रामटेके, अॕड. सी. पी शंभरकर, अॕड. एम. ए. बसोड, अॕड. व्ही. डी. रहांगडाले, संपूर्ण अधीवक्ता वर्ग न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक श्री एन.जे. लांजेवार, तसेच सर्व न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजनासाठी संपूर्ण वकील संघ व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.