शैक्षणिक

शिष्यवृत्ती परीक्षेत सरस्वती विद्यालयाचे घवघवीत यश

अर्जुनी मोरगाव: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे 2023/24 मध्ये आयोजित पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी व वर्ग आठवी करीता घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल दिनांक 30 एप्रिल 2024 ला घोषित करण्यात आला. यात सरस्वती विद्यालयाला घवघवीत यश मिळाले असून वर्ग पाचवीतील एकूण नऊ विद्यार्थी यात किमया हेमराज नंदेश्वर, सोनल घनश्याम उपरीकर,आराध्या महेंद्रकुमार कठाणे,आदिती प्रमोद घनाडे,पूर्वाई नरेशकुमार बोळनकर,वेदांत झोळे,गुंजन महेंद्र लांजेवार,जिज्ञासा ज्ञानेश्वर कोल्हे,वैष्णवी राजेंद्र नाकाडे तर वर्ग आठवीतील समीक्षा गौतम बोरकर सदर विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आहे. पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्या छाया घाटे, पर्यवेक्षक महेश पालीवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन करून आभार दिपाली कोट्टेवार यांनी मानले.