शैक्षणिक

शिष्यवृत्ती परीक्षेत एस.डी. कॉन्व्हेन्ट व जी. एम.बी. हायस्कूल चे सुयश

अर्जुनी/मोर: श्रीमती केशरबाई शिक्षण सांस्थाद्वारा संचालित सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट व जी. एम. बी. हायस्कूल येथील 15 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले.
सत्र 2023-24 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन गटांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात येते. यावर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्राथमिक गटांमध्ये एकूण 40 विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामधून आरोह आदर्शकुमार वासनिक, गोल्डी चंद्रशेखर ढोके, चेतना सहदेव बागडेरिया, चारूष जितेंद्र शेंडे, पलक सुधाकर नागपुरे हे 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले .
उच्च प्राथमिक गटांमध्ये एकूण 63 विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामधून अंश दिनेश जांभूळकर, श्रद्धा योगेंद्र गौतम, सानिया विजयकुमार कटकवार, हर्षल मोहन झोडे, धृवी महेश सुरपाम धृप प्रकाश कापगते, कांचन चक्रधर कापगते, पलक विजय सांगोळे, रिया नेतराम मलगाम, प्रिन्स पवनकुमार चव्हाण हे दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले.
सर्व पात्र विद्यार्थी व पालक यांचे समन्वयक भगीरथ गांधी व प्राचार्या शैव्या जैन यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय आई, वडील, व शिक्षकांना दिले.