विदर्भ

जयदुर्गा विद्यालय गौरनगर येथे उन्हाळी शिबिर संपन्न

विद्यार्थ्यांनी घेतली योग, धनुर्विद्या नृत्य संगीत, चित्रकला, कराटे,हस्तकला, रंगोली तसेच विविध कौशल विकासाचे धडे

अर्जुनी मोरगाव :- श्री गणेश बहुउद्देशीय संस्था अर्जुनी मोरगाव द्वारा संचालित जयदुर्गा विद्यालय गौरनगर येथे नुकतेच सात दिवसीय उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील अर्जुनी मोरगाव, खामखुरा जानवा, महागाव, बोरी, कोरंबी, टोला, असोली, गौरनगर येथील एकंदरीत 115 विद्यार्थी ह्या शिबिरात सहभागी झाले होते.
सकाळी साडेसहा पासून योग शिक्षक कांतीकुमार बोरकर यांच्या मार्गदर्शनात यौगिक क्रियांचा अभ्यास शिबिरार्थींकडून करवून घेतल्या जात होता. त्यानंतर क्रीडा संकुल अर्जुनी मोरगाव येथील प्रशिक्षक विलास रामटेके हे कराटे व धनुर्विद्येचे धडे विद्यार्थ्यांना देत होते.
त्यानंतर विविध कौशल विकासाचे वर्ग एकाच वेळी नृत्य प्रशिक्षक दिप्रा सेन मंडल, रंगोली प्रशिक्षक विश्वजीत मंडल,हार्मोनियम प्रशिक्षक संगीत विशारद राहुल सपाटे, चित्रकला शिक्षक हेडाऊ, हस्तकला प्रशिक्षक तापसी सरकार, निकिता सरकार, मोहित विश्वास, मेकअप आर्टिस्ट कृष्णा गाईन यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी धडे गिरवत होते
दिवसभर चालणाऱ्या ह्या शिबिरामध्ये स्मार्ट बोर्ड वरील एक मार्गदर्शनाचा वर्ग सोडल्यास एकाग्रता वाढीस लागणारे खेळ, विविध नैतिक गोष्टी, तसेच स्टेज प्रेझेंटेशन चे वर्ग सुरू असायचे.
शिबिरामध्ये सातपुडा, हिमालय, अरवली, निलगिरी असे प्रत्येकी तीस विद्यार्थ्यांचे गट पाडून त्यांना विविध जबाबदारीची कामे सोपवण्यात येत होती. प्रत्येक दिवशी प्रत्येक गटांनी एकेक राज्याचे सादरीकरण केले त्यात महाराष्ट्र तसेच जम्मू-काश्मीर च्या सादरीकरनाला विशेष पुरस्कृत करण्यात आले.दुपारी जेवणानंतर विद्यार्थी विविध इंडोर गेम्सचा आनंद घ्यायचे.हसत खेळत चाललेल्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.
दिनांक 2 मे ला सुरू झालेल्या
शिबिराचे उद्घाटन शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. ईश्वर मोहूर्ले,डॉ. शरद मेश्राम,
डॉ. गोपाल पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिराचे औचित्य साधून दिनांक ५ मे ला दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करून दंतचिकित्सा जनजागृती करण्यात आली यावेळी डॉ. श्याम अशोक चांडक व डॉ. रोशनी श्याम चांडक यांनी शिबिरार्थींना दातांची निगा कशी राखावी याविषयी मार्गदर्शन करून दंतशल्य तपासणी केली. मोठ्या प्रमाणात पालकांनी सुद्धा शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराचा समारोप संस्थेचे सचिव तसेच एस. चंद्रा. महिला महाविद्यालय साकोली चे प्राचार्य डॉ. राजेश चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला
यावेळी उत्कृष्ट शिबिरार्थींना पुरस्कृत करण्यात आले सर्व शिबिरार्थींना प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता.

संस्था सचिव डॉ राजेश चांडक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उन्हाळी शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य सुनीलकुमार पाऊलझगडे यांच्या नेतृत्वात शिक्षक कांतीकुमार बोरकर, प्रवीण शिंगाडे, नितीन गणवीर, वैशाली कळपते, भूवेंद्र चव्हाण,प्रफुल्ल गोल्लेलवार, संघदीप कांबळे, संतोष कुमार बिसेन, धीरज सरकार, निरज नाकाडे , ममता लंजे
तसेच संपूर्ण शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन कांतीकुमार बोरकर यांनी केले तर मान्यवरांचे आभार नीरज नाकाडे यांनी मानले .