विदर्भ

सामाजिक एकोप्यात सामावले राष्ट्रहीत– ओमप्रकाशसिह पवार

महाराणा प्रताप जयंती निमित्त अर्जुनी/मोरगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन

अर्जुनी/मोर:- 9 मे 2024 रोजी विरशिरोमनी महाराणा प्रताप यांची 484 वि जयंती स्थानीय राजपूत क्षत्रिय समाज संघटन आणि क्षत्रांनी मां पद्मावती महिला संघटन व राजपूत युवा मंच अर्जुनी/मोर यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय जिल्हा परिषद शाळा दुर्गा चौक येथील भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त समस्त समाज बांधवांनी महाराणा प्रताप याना अभिवादन केले . आयोजित कार्यक्रमात राजपूत क्षत्रिय समाज बांधवांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली . कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विराजमान ओमप्रकाशसिह पवार यांनी सामाजिक एकोप्यात राहून आपले राष्ट्र मजबूत करण्याचा संदेश उपस्थितांना दिला.कार्यक्रमाला प्रमुख स्थानी सीतारामसिह पवार,तीलकसिह चव्हाण, सुरजसीह परिहार,सुमनबाई गंगारामसिह चंदेल,अनुसयाबाई टीकारामसिह परिहार,महिला संघटन अध्यक्ष रोशनी पवनकुमार पवार,उपाध्यक्ष निलेश्वरी भगवानसिह चव्हाण,सचिव समिता जीतेंद्रसिह परिहार,राजपूत युवा मंच अध्यक्ष कामलसिंह राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.राजपुत समाजातील गुणवंत तसेच सामाजिक कार्यात काम करीत असलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये शिक्षण क्षेत्रात सेवानिवृत्त झालेले ओमप्रकाशसिह पवार,अकोला विद्यापीठ येथून सुवर्ण पदक मानकरी स्वेता संजयसिह पवार,शेकडो तरुणांना व्यसन मुक्त करून नवजीवन देणारे संदीप तीलकसिह चव्हाण,व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्यात नेतृत्व करीत असलेली जानवी राकेशसिह चंदेल,खुशी पवनकुमार पवार,विज्ञान क्षेत्रात विज्ञान प्रदर्शनी मध्ये राज्यात निवड झालेली सौर्या ओमप्रकाशसिह पवार, गोंदिया जिल्ह्यातुन सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त करणारे अश्विनसिह राजकुमारसिह गौतम यांचा समावेश होता.समाजातील महिला संघटन तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लहान बालगोपाल अद्वैत अजयसिह पवार,सौम्या पुरुषोत्तमसिह जयवार, विरसिह रमेशसिह बैस यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवन चरित्रावर मत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली,कार्यक्रमाच्या यशस्विते करीता पवनसिह पवार,ओमसिह सोंनग्रे,चरनसिह चंदेल,ममता पवार,मुकेशसिह पवार,कमलसिह राठोड,छत्रपालसिह परिहार,प्रमोदसिह चंदेल,प्रकाशसिह चव्हाण,आदी ने परिश्रम केलेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनसिह गौतम तसेच आभार रोशनी पवार यांनी मानले.