राजकीय

विद्यमान नगरसेवक अनिल राजगिरे अनंतात विलीन

सडक अर्जुनी :- येथील नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक, माजी बांधकाम सभापती, काँग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष, गोंदिया जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक तथा आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे संचालक अनिल राजगिरे यांचे बुधवारी (ता.15) रात्री 12 च्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. गुरुवारी (ता.16) दुपारी 12 वाजता त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांचे हजारो चाहते उपस्थित होते. सडक अर्जुनी जवळील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शोकसभा घेण्यात आली. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार दिलीप बन्सोड, तालुका अध्यक्ष कांग्रेस कमिटी मधुसूदन दोनोडे,डॉ. योगेंद्र भगत, अमर वऱ्हाडे,देवेंद्र तिवारी, गंगाधर परशुरामकर, शेषराव गिऱ्हेपुंजे, येसूलाल भालेकर, आमदार नानाभाऊ पटोले यांचे प्रतिनिधी हरगोविंद भेंडारकर, डॉ. अविनाश काशिवार, दामोदर नेवारे, देवचंद तरोणे,राजेश नंदागवळी,अशोक चांडक, अनिल दहिवले, संदीप भाटिया, रत्नदीप दहिवले, दिलीप गभणे, अनिल मेश्राम,रवींद्र पंचभाई आदी व इतर प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.