गाव तिथे ग्रंथालय असायला पाहिजे डॉ. भारत लाडे
अर्जुनी मोरगाँव :- “ज्ञान” हीच खरी संपत्ती असून त्यानेच व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो याचा ध्यास घेऊन तिडका या ग्राम निवासी गावातील युवक तथा ग्रामपंचायत तिडका यांच्या मदतीने सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.
उदघाटन सोहळा दिनांक 19/05/2024 ला संपन्न झाला. या उदघाटन सोहळ्या प्रसंगी मा.डॉ. भारत लाडे सामाजिक कार्यकर्ता तथा उपाध्यक्ष, युवक काँग्रेस गोंदिया हे उपस्थित होते. उदघाटनाप्रसंगी डॉ. भारत लाडे यांनी युवकांना तथा उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना म्हटले की, ज्ञान हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे अतिशय महत्त्वाचे साधन आहे. ज्ञानानेच व्यक्ती आपली प्रगती करू शकतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्याप्रमाणे “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” म्हणूनच प्रत्येक गावात ज्ञानग्रहणासाठी एक तरी वाचनालय असणे आवश्यक आहे. तिडका गावातील युवकांच्या पुढाकाराने तयार झालेले हे वाचनालय विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी व गावाच्या विकासासाठी मोलाचे साधन ठरेल असे त्यांनी म्हटले.
या कार्यक्रमाप्रसंगी मा.मनोहरजी चंद्रिकापुरे आमदार विधानसभा क्षेत्र अर्जुनी मोर, रत्नदीपजी दहिवले,सौ बबीताताई उईके सरपंच ग्रामपंचायत तिडका, हेमराजजी उईके तं. मु.अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य तिडका, गावातील प्रतिष्ठित मान्यवर, नवयुवक उपस्थित होते.