जी. एम. बी. कनिष्ठ महाविद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
अर्जुनी/मोर: श्रीमती केशरबाई शिक्षण संस्थाद्वारा संचालित जी.एम.बी. कनिष्ठ महाविद्यालयाने आज दिनांक 21 मे रोजी जाहीर झालेल्या एच.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के निकाल देत यशाची परंपरा कायम ठेवली.
सत्र २०२३-२४ मध्ये एकूण ७३ विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. त्यामधे महाविद्यालयातून गुनानुक्रमे वेदांत रेशीम परशुरामकर ९०.१७% गुण घेऊन प्रथम, नीरज अतुल कडूकर ७९.५०% द्वितीय, हेमकृष्ण गोवर्धन परशुरामकर ७६.६७% तृतीय, अनिकेत राजेंद्र नाकाडे ७६.००% चतुर्थ, श्रीकांत रुपचंद कापगते ७५.१७% पंचम.
निकालामध्ये ९०% च्यावर एक विद्यार्थी, ७०% च्यावर दहा विद्यार्थी, ६०% च्यावर बत्तीस विद्यार्थी, ५०% च्यावर तीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थद्याक्ष डॉ.बल्लभदास भुतडा, संस्थाध्यक्ष जयप्रकाश भैय्या, संस्थसाचिव सर्वेश भुतडा, समन्वयक भगीरथ गांधी, प्राचार्या शैव्या जैन, प्राचार्य जे.डी.पठाण उप प्राचार्या छाया घाटे, पर्यवेक्षक महेश पालीवाल प्रा. टोपेशकुमार बीसेन यांनी प्रथम आलेला विद्यार्थी वेदांत परशूरामकर याचे त्याच्या आई वडील यांच्यासोबत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्यात.
विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय आई, वडील व शिक्षकांना दिले.