General

सौंदड येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

सडक अर्जुनी :- सौंदड येथे वैशाख बुद्ध पौर्णिमा थाटात पार पडली.बुद्ध जयंतीनिमित्त सकाळी सौंदड नगरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्डातील महामानव शांतीचे अग्रदूत तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांचे हस्ते माल्यार्पण करुन बुद्ध वंदनेने सुरुवात झाली.गावात असलेल्या सर्व थोर पुरुष समाजसुधारक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.संविधान चौकातील पुर्णाकृती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पहार घालून अभिवादन केले. सायंकाळी बुद्ध पौर्णिमेचा मुख्य कार्यक्रम धम्म साधना बुद्ध विहार, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसरात साजरा करण्यात आला.अध्यक्षस्धानी अभिवक्ता अनमोल राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ विनोद गेडाम , सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल मेश्राम, रामचंद्र भैसारे, कार्यकारी अभियंता सत्यजित राऊत, डॉ. नरेश भैसारे, चरणदास शहारे , राजेश भैसारे,रोणुदास जांभुळकर,आशिक राऊत , संदीप टेंभुर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व प्रथम पंचशील धम्म ध्वजारोहण प्यारेलाल राऊत यांच्या हस्ते करण्यात आले लगेचच विहारात रामचंद्र भैसारे यांचे मार्गदर्शनात सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली व विहारात भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तसेच मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून अभिवादन केले.भारतात बौद्ध धम्माचे पुनर्जीवन १९५४ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार,भारतीय बौद्धांच्या समस्या व माझी जबाबदारी या विषयावर डॉ विनोद गोंदिया यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच अनिल मेश्राम यांनी उपस्थित जनसमुदाय यांना बुद्ध पौर्णिमा,वैशाख पौर्णिमा चे महत्व समजावून सांगितले.दिलेल्या विषयावर आपले विचार मांडले.प्रास्ताविक संदीप टेंभुर्णे यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद एस पी ऐरावत यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाला बहुसंख्येने बौद्ध उपासक उपासिका व गावकरी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी धम्म साधना बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी, बौद्ध उपासक उपासिका यांनी मोलाचे योगदान दिले.शेवटी खीर वाटप करुन समारोप करण्यात आला.