भद्रुटोला कारंजा येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी
गोंदिया :- प्रज्ञाशील करुणा ह्या मार्गाने प्रत्येकाने जाण्याची गरज आहे जर आपल्याला आपले जीवन धन्य करायचे असेल तर तथागतानी उपासकांना पाच शील म्हणजे पंचशील धारण करावे व सदाचाराने जगण्याचा मंत्र दिला आहे. आपण सर्वांनी ते ग्रहण करावे असे आयोजित कार्यक्रमात भदंत डॉक्टर बुद्धरत्न संबोधी महाथेरो यांनी सांगितले. भद्रुटोला कारंजा येथील नवयुवक बुद्ध विहार समिती द्वारा भगवान गौतम बुद्ध यांची 2586 वी जयंती मोठ्या हर्ष उत्साहाने साजरी करण्यात आली त्या कार्यक्रमात धम्म उपदेश देण्यासाठी व परित्राण पाठ करण्यासाठी भदंत डॉक्टर बुद्ध रत्न संबोधी महाथेरो नागपूर हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सुदोधन सहारे सत्यशोधक प्रबोधनकार व आंबेडकरी विचारवंत हे होते. भंते डॉक्टर बुद्धरत्न यांनी बुद्धाचे विचार आत्मसात करण्याचा सल्ला दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बावीस प्रतिज्ञाच्या पालन करून प्रत्येकाने आपले जीवन जगावे भेदभाव दूर सारून मैत्री भावाने समाजाने पुढे यावे व संघटित होऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढावे, असे माननीय शुद्धोधन सहारे सत्यशोधक प्रबोधनकार यांनी सांगितले. सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये कपूर रंगारी, मीनाक्षी बागडे, पायल रंगारी, अलका रंगारी, पोलीस पाटील निशा गणवीर, हेमराज रंगारी, गोवर्धन बागडे, विनोद रंगारी, कमलेश बागडे व समस्त गावकरी उपस्थित होते.