शैक्षणिक

नंगपूरा-मुर्री निवासी शाळेतून निलेश बडोले प्रथम तर यश भोयर द्वितीय

शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

गोदिंया : – शहराला लागून असणारी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपूरा-मुर्री येथील वर्ग दहावीचे माध्यमिक शालान्त परिक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये बारा विद्यार्थी प्राविण्य प्राप्त असून तेरा प्रथम श्रेणीत आले.

यावेळी शाळेतून निलेश राजकुमार बडोले ८४.०० टक्के घेऊन प्रथम आला तर यश भोयर याने ८३.४० घेऊन द्वितीय आला, तृतीय प्रफुल्ल नंदेश्वर ८२.४० तर धम्मदिप राऊत ८२.४० यांनी मिळविला आहे.

माध्यमिक शालान्त परिक्षा मार्च २०२४ परिक्षेत सर्व विद्यार्थी पास होऊन शाळेचा शंभर टक्के लागलेला आहे. याप्रसंगी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी भ्रमणध्वनी वरुन अभिनंदन केले.

शाळेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल जाहीर झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना मुख्याध्यापक रविशंकर इठूले, नीता भलमे, प्रदीप ढवळे, साधना पारधी, मुन्नाभाई नंदागवळी, तुषार महाजन आदी उपस्थित होते.