जानवी लंजेला जायचय प्रशासकीय सेवेत
सडक अर्जुनी :- तालुक्यातील ग्राम पळसगाव येथील रहिवासी कु जानवी रामेश्वर लंजे हीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत नवजीवन विद्यालय राका येथे ९३.४० गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. तीचे अभिनंदन करण्यासाठी सौंदड निवासी समाजशील शिक्षक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल मेश्राम यांनी ग्राम पळसगाव येथे जानवीच्या घरी जाऊन आईवडील यांचे उपस्थितीत सत्कार केला.सत्कार प्रसंगी ग्रामगीता, पेन,गुलाबपुष्प आणि मिठाई भरवून अभिनंदन केले.यावेळी नवजीवन शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा सचीव मधुसूदन दोनोडे,मुलीचे वडील व काका उपस्थित होते.
अभिनंदन करुन मेश्राम यांनी जानवी सोबत संवाद साधून तिच्या यशाबद्दल विचारले तर तीने आपल्या यशाचे श्रेय आई गिता ताई,वडील रामेश्वर ,मुख्याध्यापक, शिक्षकवृंद यांना दिले.मी शाळेतून पहिली येणार हा विश्वास होता असे सांगितले.या साठी मी नियमित सहा तास अभ्यास करून यशस्वी झाले आहे.या पुर्वी इयत्ता आठवीत जानवीने एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन शिष्यवृत्ती करीता निवड झाली आहे.या पुढे विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन जीवनात प्रशासकीय सेवेत जाऊन देश सेवा करण्याचा माणस व्यक्त केला.तीच्या यशाबद्दल संस्थासचीव मधुसूदन दोनोडे, मुख्याध्यापक पी एम चुटे, समाजशील शिक्षक अनिल मेश्राम यांनी अभिनंदन करुन पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.