सुतार काम करणाऱ्याचा मुलगा आला शाळेतून पहिला
भविष्यात लष्करात जाऊन करणार देशसेवा
सडक अर्जुनी/ चिखली :- तालुक्यातील ग्राम कोहळीटोला येशील गणेश महेश बोरकर हा रत्नदीप विद्यालय चिखली शाळेतून इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत ८४.६० टक्के गुण मिळवून पहिला आला . अडचणींवर मात करून शाळेतून पहिला आला या बद्दल सौदड येथील समाजशील शिक्षक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल मेश्राम यांनी ग्राम कोहळीटोला येथे गणेश च्या घरी जाऊन आईवडील यांचे उपस्थितीत सत्कार केला.या प्रसंगी प्रामुख्याने नवजीवन शिक्षण संस्था राका येथील संस्थापक तथा संस्था सचीव मधुसूदन दोनोडे उपस्थित होते.सत्कार निमित्त महात्मा फुले यांची ‘गुलामगिरी ‘ हा ग्रंथ पेन गुलाबपुष्प आणि मिठाई भरवून अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.गणेश यांचेशी मेश्राम यांनी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की भविष्यात मला लस्कारात जाऊन देश सेवा करायची आहे.परिस्थीती जेमतेम बेताचीच.वडील सुतार काम करुन उदरनिर्वाह चालवतात तर आई गृहिणी आहे. झोपडीवजा घरात राहुन नियमित अभ्यास करून यश संपादन केले.लहानशा खेड्यातील मुलगा शाळेतून पहिला आला या बद्दल मुख्याध्यापक, गावकरी यांनी त्याचे अभिनंदन केले