विदर्भ

ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे फिजिओथेरपी कॅंप संपन्न

फिजीओथेरपी ही आधुनिक पद्धती असुन आरोग्याची गुणवत्ता सुधारतात. आयुष्यातील प्रत्येक क्षणाची जपणूक करण्यासाठी, व्यक्तींनी वेदना दूर करण्यासाठी आणि चांगल्या आरोग्याचे स्वागत करण्यासाठी अशा थेरपीची मदत घेणे आवश्यक आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी हे प्रभावी आहे कारण थेरपीचे मुख्य उद्दिष्ट गतिशीलता आणणे, कार्य वाढवणे आणि शरीरात लवचिकता वाढवणे आहे.सामान्यतः शारीरिक क्षमता सुधारण्यास, वेदना कमी करण्यास आणि कोणत्याही प्रकारचे अपंगत्व टाळण्यास मदत करते.शस्त्रक्रियांमधून सतत होणाऱ्या वेदनांपासून बरे होण्यासाठी हे आवश्यक आहे आणि प्रामुख्याने अर्गोनॉमिक्स, सांधे किंवा स्नायू दुखणे, कडकपणा आणि लवचिकता जोडणे यावर लक्ष केंद्रित करते.रुग्णांना सर्वोत्तम आसन, व्यायाम कसे करावे आणि वेदना व्यवस्थापन तंत्र याबद्दल शिक्षित करते. हृदयविकाराचा झटका किंवा हृदय अपयशानंतर त्वरित पुनर्प्राप्तीसाठी फिजिओथेरपी आवश्यक असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिष मोहबे यांनी म्हटले आहे.जिल्ह्यात राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात भौतिकोपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर यांच्या पथकामार्फत फिजीओथेरपी बाह्यरुग्ण सेवा दिली जात असुन रुग्ण व लोकांना व्यायामविषयक मार्गदर्शन दिले जात आहे.
दि.4 जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत भौतिकोपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर द्वारा व्यायाम विषयक मार्गदर्शन, रुग्ण तपासणी व उपचार करण्यात आले. महिन्याच्या पहिल्या गुरुवारी ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे भौतिकोपचार तज्ञ ओपीडीच्या वेळेत मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील अशी माहिती कार्यक्रम समन्वयक डॉक्टर स्नेहा वंजारी यांनी या प्रसंगी दिली आहे.तसेच दंत शल्य चिकित्सक डॉ.प्रणव शेवाळे यांनी रुग्णांना बीपी,शुगर व कॅन्सर याबाबतीत मोलाचे मार्गदर्शन केले व तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजाराबाबत जनजागृती करून तंबाखू न खाण्याची शपथ रुग्णांना देण्यात आली. ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.पी.के.पटले, वैद्यकीय अधिकारी डॉ.खंडेलवाल, सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर व इतर कर्मचारी वर्ग या वेळी उपस्थित होता.