राजकीय

अर्जुनी मोरगाव विधानसभा समन्वयकपदी प्रमोद पाऊलझगडे यांची निवड

अर्जुनी मोर :- येत्या दोन-तीन महिन्यात महाराष्ट्रात 2024 च्या विधानसभा निवडणुका येत आहेत. सर्वच पक्ष त्या दिशेने कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुका काबीज करण्यासाठी काँग्रेसने आपली तयारी सुरू केली आहे. त्यानिमित्त भंडारा-गोंदिया जिल्ह्यात विधानसभा निहाय समन्वयकांची 9 जुलै च्या पत्रान्वये नियुक्ती केली आहे. अर्जुनी मोरगाव ह्या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा क्षेत्रात प्रमोद पाऊल झगडे यांची विधानसभा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्निथलाजी यांचे आदेशावरून व काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांचे सूचनेनुसार विधानसभा निवडणूक 2024 साठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाकरिता विधानसभा समन्वयक म्हणून 11 लोकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे काँग्रेसचे प्रशासन व संघटन सरचिटणीस नाना गावंडे यांच्या पत्रान्वये माहिती मिळाली आहे. यामध्ये 60 तुमसर विधानसभेसाठी अमर रगडे, उमेश्वर कटरे ,61 भंडारा( अनुसूचित जाती ) प्रेम वनवे, सुभाष आजबले, 62 साकोली विधानसभेसाठी ऍड. शफी लद्दानी ,प्रदीप बुराडे, ६३ अर्जुनी मोर ( अनुसूचित जाती ) प्रमोदभाऊ पाऊलगडे, 64 तिरोडा विधानसभेसाठी डॉ. झामसिंग बघेले, जागेश्वर निमजे, 65 गोंदिया विधानसभेसाठी राजकुमार पटले, 66 आमगाव ( अनुसूचित जमाती ) उषाताई मेंढे आदींची विधानसभा निहाय समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त विधानसभा समन्वयकांनी आपल्याला जबाबदारी दिलेल्या विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून संबंधित जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, आघाडी संघटना, विभाग व सेल प्रमुख यांची बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घ्यावा व निवडणुकीची रणनीती तयार करावी असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.