मनोहरभाई कृषी महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांचे मधमाशी पालन शेतीला अभ्यास भेट
गोरेगाव :- मनोहर भाई कृषी विद्यालय हिरा टोलाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच तालुक्यातील महागाव येथील परिसरातील शेतीमध्ये भेट देऊन मधुमाशीपालन कशा पद्धतीने केले जाते याचे अवलोकन करून अभ्यास केला.विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य एस. सी . अवताले ,प्राध्यापक डॉ. व्ही . एन.नंदेश्वर,विभाग प्रमुख डॉ. एस बी वासनिक, के. के. किरसान ए.जि.तागडे इत्यादी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले
महाविद्यालयाचे विद्यार्थी मानस बीसेन ,अविनाश भेंडारकर, तन्मय राहणं, आदित्य चांदेवा, राम चौधरी दिव्यांश पटले,देवांश पटले यांनी महागाव येथील हेमलता डोंगरवार यांच्या शेतातील मधुमाशी पालन केंद्राला भेट देऊन व मधमाशी पालन विषयी जाणून घेतले व संपूर्ण अवलोकन केले शेतकरी हेमलता ताई डोंगरवार ह्या सुद्धा याप्रसंगी उपस्थित होत्या.
याप्रसंगी राशील हेल्प ग्रुप महागाव यांनी सुद्धा सहकार्य केले.