राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांना वाहिली आदरांजली
अर्जुनी मोर:- हॉकीचे जादूगर नावाने संपूर्ण जगात प्रख्यात असलेले मेजर ध्यानचंद यांच्या सारख्या खेळाडू वृत्तीच्या गुणाला आत्मसात करण्याकरिता प्रत्येक खेळाडूने काटेकोर प्रयत्न केले पाहिजे. असे मत सुरभी स्पोर्टिंग क्लबचे संस्थापक अध्यक्ष दिवाकर चुटे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले. क्रीडा संकुल अर्जुनी मोर येथील पटांगणात सुरभी स्पोर्टिंग क्लब च्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.राष्ट्रीय क्रीडा दीना निम्मित आयोजित कार्यक्रमात सुरभी स्पोर्टिंग क्लब च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते उपस्थित खेळाडूंना स्पोर्ट किट वितरित करण्यात आली.याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकत उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे यांनी क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडावे या करिता प्रयत्न रत असले पाहिजे यश नक्की मिळतो हिंमतीने समोर जाण्याचे मार्गदर्शन केले. आयोजित कार्यक्रमा प्रसंगी शारीरिक शिक्षक एम. के. पालीवाल, शिक्षिका एम. आर. वनवे, ए. डी. कांबळे,एस. एस. अंधारे, पुस्तोडे सर, रामटेके सर वाघाडे सर, आदी मान्यवर उपस्थित होते.