विदर्भ

राजकुमार बडोले फाउंडेशन च्या वतीने पवनी/धाबे येथे भव्य आदिवासी मेळावा व सत्कार समारोह

अर्जुनी मोर. :- माजी मंत्री राजकुमार बडोले फाउंडेशन सडक/ अर्जुनी च्या वतीने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पवनी/ धाबे येथे (दि. 8 सप्टेंबर) रोजी दुपारी 12 वाजता भव्य आदिवासी जनजागृती मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री माधवराव पाटील डोंगरवार विद्यालय पवनी /धाबे येथील भव्य प्रांगणात आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अध्यक्ष आदिवासी ध्रुव गोंड समाज दृग चे एम. डी. ठाकूर राहणार आहेत. मेळाव्याचे उद्घाटन आदिवासी आघाडी प्रदेश सचिव तथा सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ डॉ. प्रकाश गेडाम यांचे हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले,तर दीप प्रज्वलन माजी आमदार संजय पुराम, सहउद्घाटक म्हणून चंदाताई कोडवते तर उपाध्यक्ष म्हणून दुर्गाप्रसाद कोकोडे, विशेष अतिथी म्हणून अर्जुनी मोर पंचायत समितीच्या सभापती सविता कोडापे, उपसभापती होमरात पुस्तोडे, माजी सभापती प्रकाश गहाणे, पंचायत समिती सदस्य नाजूक कुंभरे ,हरिचंद्र उईके, तानेश ताराम, लक्ष्मीकांत धानगाये, हनवंत वटी, पं.स.सदस्य चेतन वडगाये, सुदाम कोवे, प्रल्हाद वरठे, जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे, जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर, पोर्णिमा ढेंगे, जयश्री देशमुख, निशा तोडासे ,भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते, राजहंस ढोक, पंचायत समिती सदस्य चंद्रकलाबाई ठवरे, पंचायत समिती सदस्य सपना नाईक, भाग्यश्री सयाम, फुलचंद बागडेरिया ,स्थानिक सरपंच सदस्य व परिसरातील मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या भव्य आदिवासी जनजागृती मेळावा चे औचित्य साधून प्राविण्य प्राप्त गुणवंत आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थिनी (दहावी व बारावी) व आदिवासी समाजातील आजी-माजी पदाधिकारी, नवनियुक्त कर्मचारी, व आदिवासी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याच्या निमित्ताने प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी बिरसा मुंडा स्मारक समिती, बिरसा मुंडा युवा स्मारक समिती, बिरसा मुंडा महिला स्मारक समिती पवनी/ धाबे तथा आदिवासी आघाडी तालुका अर्जुनी मोरगाव हे विशेष परिश्रम घेत असून या जनजागृती मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजकुमार बडोले फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.