महात्मा गांधींचा जीवनप्रवास यावरील मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शन आज पासून
श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे 4 ऑक्टोंबर पर्यंत चालणार प्रदर्शन
नागरीकांसाठी निःशुल्क प्रवेश
अमरावती 1 ऑक्टोबर 2024:- महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, अमरावती, जिल्हा प्रशासन अमरावती, जिल्हा परिषद अमरावती, महानगरपालिका अमरावती, पोलिस अधिक्षक कार्यालय अमरावती, महिला व बालविकास विभाग, जि. प. अमरावती, जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्शी मार्गावरील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे उद्या बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधींच्या जीवनप्रवास या विषयावर आधारित मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन 4 ऑक्टोंबर 2024 प्रयंत चालणार असून नागरीकांसांठी निःशुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. या प्रदर्शनात महात्मा गांधी यांच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणांचे तसेच त्यांच्या विचारधारेचे दर्शन घडवणाऱ्या विविध छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महानगर पालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्रा, पोलिस अधिक्षक विशाल आनंद, केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसुरे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार उपस्थित राहणार आहेत.
सदर प्रदर्शनाला नागरीक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट देऊन महात्मा गांधी यांचा जीवन परिचय जाणून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांचा सन्मान आज
महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, अमरावती यांच्याद्वारे यावर्षी राष्ट्रीय पोषण माह मध्ये उत्कृष्ट कार्य करत अमरावती जिल्ह्याने महाराष्ट्र राज्यातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत आयसीडीएस दिनाच्या दिवशी राष्ट्रीय पोषण माह मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा जिल्हाधिकारी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.