शांतता व एकतेचे प्रतिक देणारे महात्मा गांधी यांचे कार्य अजरामर…. रविशंकर इठूले यांचे प्रतिपादन : गांधी व शास्त्री जयंती साजरी
गोदिंया :
या देशाचे सुत्र हातात घेऊन देशाला नवी वळण देणारे आणि समाजिकता पाळणारे महात्मा गांधी यांनी देशाते हित साधले. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. त्या प्रयत्नाची सर्व देशवासीयांनी जाण ठेवली पाहिजे. म्हणून शांतता व एकतेचे प्रतिक देणारे महात्मा गांधी यांचे कार्य अजरामर आहेत. असे प्रतिपादन मुख्याध्यापक रविशंकर इठूले यांनी केले. ते अध्यक्ष स्थानावर बोलत होते.
यावेळी अस्मिता तेलंग, साधना पारधी, मुन्नाभाई नंदागवळी, प्रगती खोब्रागडे, स्वाती राणा, अर्चना चव्हाण, प्रदीप ढवळे व तुषार महाजन आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रसंगी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना माला अर्पण केली. दीपप्रज्वलन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी यावेळी अभिवादन केले. तसेच आपले विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रम अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपूरा-मुर्री येथे (दि.०२-१०) सकाळी ७.३० वाजता संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक मुन्नाभाई नंदागवळी यांनी मानले. अशाप्रकारे कार्यक्रम समाप्त झाला.