निवासी शाळा नंगपूरा-मुर्री कबड्डी संघ विजयी होऊन विभागावर खेळणार
विजयी संघ विभागावर खेळणार : जिल्हास्तरीय कबड्डी प्रथम क्रमांक
गोदिंया :
तालुक्यातील नंगपूरा-मुर्री येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेच्या चमुने वयोगट १४ संघ तालुका जिल्हास्तरिय कबड्डी खेळात प्रथम क्रमांक पटकवून विजयी झाला. आता हा संघ विभागीयस्तरावर खेळणार आहे.
सदर सांघिक खेळ हे क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी गोदिंया अंतर्गत कबड्डी मुले असे खेळ सुरू आहेत. सदर स्पर्धा ही क्रीडा संकुल गोदिंया या पटांगणावर विजयी सामना (दि.२९) दुपारी ०३.०० वाजता दरम्यान झाला. यामध्ये गोदिंया जिल्ह्यातील कबड्डी वयोगट १४, १७ व १९ असे होते. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपूरा-मुर्री या चमुने सहभाग घेऊन वयोगट १४ जिल्हास्तरीय कबड्डी प्रथम क्रमांक मिळवून विजयी झाला आहे.
यामध्ये सहभागी विद्यार्थी प्रशांत रक्षा, हेमंत उईके, सागर कोहरे, आदित्य कोकोडे, आदित्य जमदाळ, आर्यन सोनवणे, विक्रांत टेंभूर्णे, गौरव जमदाळ, धृप लटये, तन्मय बागडे दक्ष मेश्राम तसेच मार्गदर्शक शिक्षक मुन्नाभाई नंदागवळी यांनी सराव करून घेतले. मुन्नाभाई नंदागवळी यांनी कबड्डी खेळाचे नवनवीन टिप्स देत, सकाळ सायंकाळी सराव करवून विजय प्राप्त केले.
विजयाच्या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खूरपुडे, ए. बी. मरस्कोल्हे यांच्यासह सहायक आयुक्त विनोद मोहतूरे यांच्या नेतृत्वात शाळेचे मुख्याध्यापक रविशंकर इठूले यांनी अभिनंदन करत शाळेचे शिक्षक कार्तिक शहारे, प्रदिप ढवळे, नीता भलमे, साधना पारधी, अस्मिता तेलंग, स्वाती राणा, प्रगती खोब्रागडे, अर्चना चव्हाण, तुषार महाजन आदी शाळेतील कर्मचारी व बाह्य स्त्रोत कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.