जि. प.मोरगाव शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने स्वच्छता हीच सेवा समारंभ संपन्न
अर्जुनी मोरगाव:- जगाला सत्य, अहिंसेचा मार्ग दाखवणारे महात्मा गांधीजी आणि हरितक्रांती चे जनक पूर्व पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीच्या जयंती उत्साहाचे औचित्य साधून जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव येथे स्वच्छता हीच सेवा कार्यक्रम संपन्न झाला .
प्रस्तुत कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
या महापुरुषाच्या जीवन चरित्रावर सु.मो. भैसारे यांनी प्रकाश टाकला. महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा, न्याय या तत्त्वांची आज काळाची गरज असून, सुखी -संपन्न व समाधानी जीवन जगण्यासाठी गांधीजींच्या तत्व अनुसरण्याचे प्रतिपादन याप्रसंगी केले. तदनंतर स्वच्छता विषयक जनजागृती निमित्ताने गावातून प्रभात फेरी, काढण्यात आली व गाव परिसर स्वच्छ करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापिका रेखा गोंडाने, ग्रामपंचायत मोरगावचे सरपंच गीता नेवारे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश लाडे ,सदस्य विद्या शहारे, पद्मिनी चाचणी, मुरारी उईके , देवानंद शहारे ,ललित पर्वते, परसराम लाडे जितेंद्र ठवकर, रेवानंद उईके, विलास भैसारे ,अचला कापगते, रूपाली मेश्राम,रुषेश्वर मेश्राम व गावातील प्रतिष्ठित लोकांनी सदर स्वच्छता विषयक जनजागृतीसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी रुचिता शहारे तर आभार प्रदर्शन समीक्षा राऊत यांनी केले