शैक्षणिक

रत्नदीप विद्यालयात डॉ. बाबासाहेबांना केले विनम्र अभिवादन

सडक अर्जुनी :- चिखली येथील रत्नदीप विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एल. एम. पातोडे होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अर्जुनी मोर चे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पी. डी. बांबोळे, सडक अर्जुनीच्या नायब तहसीलदार प्रेरणा कटरे, सडक अर्जुनी येथील राजीव गांधी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. राजकुमार भगत, चिखली केंद्राच्या केंद्रप्रमुख करुणा वासनिक, सेवानिवृत्त शिक्षक ए. बी. बोरकर, सेवानिवृत्त शिक्षक आर. व्ही. मेश्राम, शाहिद पटेल आदी उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्रिन्सि साखरे, दीक्षा तुमसरे, वैष्णवी बनकर या विद्यार्थिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण दिले तर सोहम शिवणकर, टिंकेश बहेकार, नेहा, डीलेस्वरी, भैरवी, अंजली कुरसुंगे, जानव्ही खोटेले, सुप्रिया उके, किरण मेंढे, स्वाती मेश्राम, गुंजन हुमे, लावण्या वालदे, दीपाली, वैष्णवी, तनुश्री आदी विद्यार्थिंनी गीत सादर केले.उपस्थित मान्यवरांनी देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षक एस. बी. मेंढे यांनी केले तर आभार शिक्षिका जयश्री कढव यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.