जीवन कसे जगावे हे शिकण्याचे माध्यम म्हणजे भगवतगिता – लालितादेवी भुतडा
सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट व जी. एम. बी. हायस्कूल येथे गीता जयंती साजरी.
अर्जुनी/मोर.: ११ डिसेंबर बुधवारला सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंट व जी एम बी इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे गीता जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ललिता देवी भुतडा समन्वयक भगीरथ गांधी,प्राचार्य जे डी पठाण उपप्राचार्य छाया घाटे प्राचार्या शैव्या जैन महेश पालीवाल उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते माता सरस्वती, युवकांचे प्रणेते स्वामी विवेकानंद व भगवत गीतेचे पूजन व दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
२५ डिसेंबर रोजी गीता जयंती आहे. गीता जयंती म्हणजे तोच दिवस, जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगितली होती. त्या अर्थाने गीतेचा जन्म या दिवशी झाला, म्हणून त्या दिवसाला गीता जयंती म्हटले जाते.
महाभारताच्या वेळी ऐन युद्धभूमीवर आपल्याच नातलगांविरूध्द शस्त्र उगारताना अर्जुन वैफल्याने ग्रासून गेला होता. या महायुद्धात होणारी प्रचंड जिवीतहानी आणि त्याचे दूरगामी परिणाम त्याला दिसत होते. एका क्षणाला त्याने युद्ध करणार नाही म्हणत हातातील शस्त्रे टाकून दिली. अर्जुनासाठी तो आयुष्यातला सर्वात मोठा नैराश्याचा क्षण होता. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी त्याला आयुष्याचे तत्वज्ञान गीतामृत स्वरूपात पाजले. त्याचे शंका निरसन केले आणि अर्जुनाच्या विनंतीवरून आपल्या विराट रूपात दर्शन दिले. युद्ध पार पडले. प्रेतांचा खच पडला, रक्ताचे चिखल झाले, मात्र सत्याने असत्यावर विजय मिळवला.
गीता जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सपना तिवारी यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संध्या ठाकूर, सरिता झोडे, ज्ञानेश्वर रोकडे, श्रध्दा कापगते , आशा ढोमणे, खुशी कांबळे, पंकज डोंगरवार नंदकिशोर सोनटक्के आदी शिक्षकांचे सहकार्य लाभले.