प्रा.आ.उपकेंद्र बोडगांव देवी येथे गरोदर मातांचा शिबीर संपन्न
बोडगांव देवी :- अर्जुनी मोरगांव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना अंतर्गत जवळील उपकेंद्र बोंडगाव देवी येथे दि.११ डिसेंबर रोजी गरोदर मतांचा शिबीर घेण्यात आला होता.
केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री मातृ दिन हि मोहिम प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला सुरू करण्यात आली, या मोहिमेच्या माध्यमातून उपकेंद्र स्थरावर गरोदर मातांचा शिबीर घेण्यात येत असतो या अनुषंगाने उपकेंद्र बोडगांव देवी येथे गरोदर मातांचा शिबीर घेण्यात आला यामध्ये बोडगांव देवी उपकेंद्रातर्गत येत असलेल्या बोदरा, देऊळगाव आणि बोंडगाव देवी येथील सर्व गरोदर मातांनी उपस्थिती दर्शवून या शिबिराचा लाभ घेतला असून यावेळी काही गरोदर माता आणि तेथील अतिजोखिम माता आढळले त्यांना त्वरीत संदर्भित करून त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशन केले गेले.
साहलीस मेथड द्वारे त्यांचा हिमोग्लोबिन तपासण्यात आले. रक्तश्राय असणाऱ्या मातांना समुपदेशन करण्यात आले. वजन, पोटाचा घेर, मातांची बी.पी (रक्तदाब), लघवी चाचणी, नवीन मातांची नोंदणी करण्यात आली व नवीन मातांचे एम.सी.पी कार्ड माता व बाल संगोपन कार्ड तयार आले. चौथ्या, सातव्या व नवव्या महिन्याच्या सोनोग्राफीचा महत्व पटवून सांगण्यात आले.
गर्भधारणा झाल्यावर लग्वी तपासणी जरी पॉझिटीव्ह आली तरी सोनोग्राफीने बाळाचा (आकार) वय हे बरोबर किती आहे व इकटॉपिक प्रेग्नेन्सी तर नाही, याचा धोका टळते. यावेळी संपूर्ण गरोदर व अतिजोखीम मतांना प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना येथे रक्त तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले. या शिबिराचा २० मातांनी लाभ घेतला असून या मातांना रक्तवाढीच्या व इतर दूध पदार्थाचा सेवन करावा असे मार्गदर्शन डॉ.श्वेता कुलकर्णी आणि डॉ.सुरेंद्र खोब्रागडे करण्यात यांनी केला. यावेळी संबंधित आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.